Shreeman legend 2 million Subscribers across over the world fans  esakal
मनोरंजन

Shreeman legend : 2 मिलियन सबस्क्रायबर्स पूर्ण करणारा 'श्रीमान लिजेंड' ठरला पहिला 'मराठी गेमर'

श्रीमानच्या श्रीमान लिजेंड लाईव्ह या गेमर्स चॅनेलनं नुकत्याच दोन मिलियन सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे.

युगंधर ताजणे

Shreeman legend 2 million Subscribers across over the world fans : टीव्ही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणारा श्रीमान बघता बघता गेमिंग झोनमध्ये गेला आणि प्रसिद्ध झाला. आज भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय गेमर्समध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. श्रीमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे.

श्रीमानच्या श्रीमान लिजेंड लाईव्ह या गेमर्स चॅनेलनं नुकत्याच दोन मिलियन सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे. त्याच्यानंतर त्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यानं ही कामगिरी केली आहे. त्याच्या चाहत्यांना, नेटकऱ्यांनी ही बातमी कळताच त्यांनी श्रीमानवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

श्रीमान हा पब्जी पीसी खेळणारा पहिला भारतीय गेमर्स असल्याचे सांगितले जाते. काहींनी त्याच्याविषयी माहिती नाही, पण तो पूर्वी टीव्ही मालिकांचे पटकथा लेखन करायचा. त्यानंतर त्यानं गेमिंग फिल्डमध्ये इंट्री केली. आता तो त्यात प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. श्रीमान हा पहिला मराठी गेमर्स ठरला आहे ज्यानं तब्बल दोन मिलियनचा टप्पा पार केला आहे.

श्रीमान हा तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गही आहे. ऑनलाईन गेमिंग आणि त्याच्या टीप्ससाठी लाखोजण श्रीमानला फॉलोही करतात. श्रीमानला आतापर्यत वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे. ऑनलाईन गेमिंग आणि गेमिंग ट्रेनिंग यातून त्यानं त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या काळात श्रीमान नव्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

श्रीमाननं इनफेमस माफिया नावाची स्वताची गेमिंग ऑर्गनायझेशन तयार केली आहे. त्याला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या श्रीमान लिजेंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT