Parag Aggrawal and Shreya Ghoshal Twitter
मनोरंजन

Twitter सीईओ पराग अग्रवाल यांचं श्रेया घोषालसोबतचं कनेक्शन आलं समोर

श्रेया आणि पराग यांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्वाती वेमूल

ट्विटर Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पराग अग्रवाल Parag Agrawal यांची नियुक्ती करण्यात आली. पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचाही Shreya Ghoshal समावेश आहे. श्रेयाने ट्विट करत पराग अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या दिल्या आहे. 'अभिनंदन पराग, तुझा खूप अभिमान आहे. आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे, तुझ्या नियुक्तीच्या बातमीचा आनंद आम्ही साजरा करतोय', असं श्रेयाने लिहिलं आहे.

अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. श्रेया आणि पराग हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यासोबत श्रेया आणि पराग यांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. पराग यांनी याआधी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर श्रेयासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. 2015 मध्ये श्रेया आणि शिलादित्य मुखोपाध्याय यांच्या लग्नातील हा फोटो असल्याचं दिसत आहे.

पराग अग्रवाल हे २०११ पासून ट्विटर कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे 'सीटीओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ट्विटरचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अग्रवाल यांनी जॅक डॉर्सी Jack Dorsey यांची जागा घेतली आहे. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट केलं. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT