Shreya Ghoshal esakal
मनोरंजन

Shreya Ghoshal: श्रेया घोषालचा आवाज गेला? पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Singer Sherya Ghoshal: बॉलीवूडची प्रसिद्घ गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या बहारदार गायनानं श्रेयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. श्रेया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. मात्र आता तिच्या त्या पोस्टनं लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. तिनचं केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

श्रेयाच्या पोस्टमध्ये काय आहे...

श्रेयानं लिहिलं आहे की, गेल्या रात्री माझा ओरलँडोमध्ये नाईट कॉन्सर्ट होता. त्यानंतर अचानक माझ्या आवाजात बिघाड झाला. मला त्रास होऊ लागला. माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील गेले होते. काय करावे मला कळेना. अशावेळी माझे चाहते आणि डॉक्टर समीर भार्गव यांनी घेतलेली काळजी यासगळ्यांना मी धन्यवाद देते.

श्रेयानं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्या कॉन्सर्टनंतर माझा आवाज हा खराब झाला आहे, ती पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. सध्या श्रेयाची प्रकृती आणि तिचा आवाज ठीक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अचानक एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टनंतर आवाज जाणे हे एखाद्या कलाकारासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. त्यात श्रेयासारख्या गायकीच्या आवाजाला बसलेला धक्का हा चाहत्यांना आणखी काळजीत टाकणारा आहे.

भारतीय संगीत विश्वातील प्रसिद्ध गायिका म्हणून श्रेयाचे नाव घेता येईल. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिनं आपल्या गायकीनं चाहत्यांना स्वरानंद दिला आहे. तिच्या पोस्टनं आता नेटकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. श्रेयाला आतापर्यत चार राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. वयाच्या अवघ्या चार वर्षाची असताना तिनं गायनाला सुरुवात केली. आता ती प्रसिद्ध गायिका झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT