Shreyas Talpade  esakal
मनोरंजन

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला शुटिंग सुरू असतानाच आला हार्ट अटॅक; तातडीनं हलवलं रूग्णालयात

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या चाहत्यांना काळजी लागून राहिली आहे

अनिरुद्ध संकपाळ

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला शुटिंग सुरू असतानाच हार्ट अटॅक अल्यानं त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस तळपदे हा वेलकम टू जंगल या चित्रपटाचं चित्रिकरण करत होता. त्यावेळी त्याला हार्ट अटॅक आला अन् तो कोसळला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर अँजिओप्लास्टी देखील करण्यात आल्याचं वृत्त आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की, श्रेयस तळपदे दिवसभर पूर्णपणे बरा होता. त्याने संपूर्ण दिवस शुटींग केले. तो शुटींग करताना पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर हशामस्करी करत होता. शुटींग करताना थोडेसे अॅक्शन असलेले सीक्वेन्स त्याने शूट केले. त्यामुळे त्याची दमछाक झाली असल्याचा अंदाज आहे

सूत्राने दिलेल्या बातमीनुसार, शूट संपल्यानंतर श्रेयस घरी परतला. घरी परतल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. श्रेयसची पत्नी दिप्ती त्याला हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी घेऊन गेली पण श्रेयस वाटेतच कोसळला.

श्रेयस सध्या ज्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे त्यांनी या बातमीला दुजोरा दिला. श्रेयस तळपदे सध्या त्यांच्याकडे उपचार घेत असून संध्याकाळी उशिरा त्याला आणण्यात आले. श्रेयसच्या प्रकृतीत कशी सुधारणा होतेय, याची डॉक्टरांना प्रतीक्षा आहे.

श्रेयस तळपदेने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अभिनयाने गाजवली आहे. दोन दशकांच्या कारकिर्दीत श्रेयसने 45 हून अधिक चित्रपट केले आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाचं श्रेयसने केलेल्या हिंदी डबिंगचं खुप कौतुक झालं. श्रेयस लवकरात लवकर बरा होईल, अशी सर्वांना आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT