Shreyas Talpade Bollywood Actor Health Updates  eSakal
मनोरंजन

Shreyas Talpade Health Update : श्रेयसच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्तीनं केलं आवाहन, 'तुम्ही फक्त...'

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Shreyas Talpade Bollywood Actor Health Updates :

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता त्याची पत्नी दीप्तीनं इंस्टावर सविस्तर पोस्ट शेयर करुन त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्यामध्ये दीप्तीनं चाहत्यांना, नेटकऱ्यांना एक आवाहनही केलं आहे.

अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगल नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी अभिनेता श्रेयस तळपदेला अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्याला हदयविकाचा झटका आला. पुढे त्याला तातडीनं मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. या सगळ्यात दीप्तीनं पोस्ट शेयर करुन त्याच्या तब्यतेविषयी अपडेट दिली आहे.

दीप्तीनं त्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

तुम्हा सगळ्यांनी माझ्या पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेली काळजी यासाठी मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. आणि आम्हाला येत्या काही दिवसांमध्ये डिस्चार्ज मिळेल. या सगळ्या काळात आम्हाला तातडीनं मिळालेली वैद्यकीय सुविधा आणि एकुण त्यांनी दाखवलेली तत्परता हे खूपच महत्वाचे आहे. (What has Deepti said in that post?)

मी सर्वांना या पोस्टच्या माध्यमातून विनंती करते की, या क्षणी आमची प्रायव्हसी जपण्यात यावी. श्रेयस बरा होईपर्यत आपण सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या शुभेच्छा आणि आधार हा आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे. अशा शब्दांत दीप्ती यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे.

श्रेयस हा फिरोज नाडियावाला यांच्या वेलकम टू द जंगल नावाच्या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास त्यात श्रेयस सोबत अक्षय कुमार, अर्शद वारसी, परेश रावल, तुषार कपूर, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिझ, लारा दत्ता यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT