मनोरंजन

Shreyas Talpade: आजारपणानंतर श्रेयस तळपदेचं कमबॅक! महेश मांजरेकरांच्या 'या' चित्रपटात करणार काम

Shreyas Talpade: आजारपणानंतर श्रेयस तळपदे पुन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) काही दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली. आता आजारपणानंतर श्रेयस तळपदे पुन्हा रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपट कधी रिलीज होणार आहे? तसेच त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव काय? याबद्दल जाणून घेऊयात..

श्रेयसनं शेअर केलं पोस्टर

श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं, "नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या कोर्या मराठी सिनेमाने…झी स्टुडिओज् प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी 'ही अनोखी गाठ'."

कधी रिलीज होणार 'ही अनोखी गाठ'?

'ही अनोखी गाठ' हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात श्रेयससोबत गौरी इंगवले देखील काम करणार आहे. गौरी आणि श्रेयस यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

श्रेयसचे आगामी चित्रपट

'ही अनोखी गाठ' या चित्रपटासोबतच श्रेयसचे आणखी काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचा इमर्जन्सी हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटातील "देखा जो तुझे यार" या गाण्यात देखील श्रेयस दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT