Shriya Pilgaonkar Sakal
मनोरंजन

Shriya Pilgaonkar Birthday: ‘एकुलती एक, लाडाची लेक’, जाणून घ्या श्रिया पिळगांवकरबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडो लोकांची मनं जिंकली आहेत.

Aishwarya Musale

मिर्झापूर ही एक अशी वेब सिरीज आहे, जिने सिनेप्रेमींना केवळ तिच्या कंटेंटनेच नव्हे तर त्यातील प्रत्येक गोष्टीने वेड लावले आहे. मालिकेतील प्रत्येक डायलॉग, प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून आहे. मग तो गुड्डू भैया असो वा मुन्ना त्रिपाठी, प्रत्येकजण आपापल्या पात्रांमध्ये परफेक्ट दिसला आणि त्यापैकी एक म्हणजे स्वीटी गुप्ता.

आज आम्ही तुम्हाला मिर्झापूरच्या स्वीटी गुप्ता म्हणजेच अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या जीवन प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जिच्या करिअरमध्ये ही वेब सीरिज निःसंशयपणे टर्निंग पॉइंट ठरली, पण ती अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला बर्थडे गर्ल श्रिया पिळगावकरच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगतो.

श्रिया पिळगावकरचा जन्म २५ एप्रिल १९८९ रोजी चित्रपटसृष्टीच्या या रंगीबेरंगी दुनियेतील दोन कलाकारांच्या घरी झाला. प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना या दिवशी त्यांच्या लहान मुलीचे स्वागत करताना आनंद झाला.

चित्रपट घराण्याशी संबंधित असलेल्या श्रियाच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच अभिनय होता, त्यामुळे अभिनेत्रीचाही लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. अभ्यासासोबतच श्रियाने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. 'तू तू मैं मैं' या टीव्ही शोमध्ये ती पहिल्यांदा बालकलाकार म्हणून दिसली होती.

2012 मध्ये ती करण शेट्टीच्या 'फ्रीडम ऑफ लव्ह' या 10 मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. श्रियाचे अष्टपैलुत्व या चित्रपटातूनच दिसून आले, कारण तिने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही तर गाणे आणि डान्स सादर केले. मात्र, त्यानंतर तिने आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले होते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रियाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, तसेच हार्वर्ड समर स्कूल, यूएसए येथून अभिनयाचा डिप्लोमा केला. अभिनय क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर श्रिया पिळगावकर भारतात परतली आणि तिने पुन्हा एकदा अभिनयाला सुरुवात केली आणि सहा वर्षांनी ओटीटीमध्ये एंट्री केली.

OTT वर एंट्री करण्यापूर्वी श्रियाने 2013 साली 'एकुलती एक' या मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात अभिनय करून श्रियाने सहा पुरस्कार जिंकले. चित्रपटातील तिची प्रतिभा पाहून देशच नव्हे तर परदेशातील निर्माते, दिग्दर्शकही तिच्या अभिनयाचे चाहते झाले. श्रियाला ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते क्लॉड लेलौच दिग्दर्शित 'अन प्लस अन' या फ्रेंच चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली.

या ऑफरनंतर तिच्या आयुष्यात तो दिवस आला जेव्हा तिला 'मिर्झापूर'साठी कॉल करण्यात आले. 2018 मध्ये, ती 'मिर्झापूर' मध्ये दिसली आणि पडद्यावर गुड्डू भैय्यासोबत रोमान्स केला, ज्याला लोकांनी खूप पसंत केले. यानंतर श्रियाने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आणि प्रसिद्ध झाली.

ओटीटी आणि टेलिव्हिजनवर धमाका करणाऱ्या श्रिया पिळगावकरच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल बोलताना, या अभिनेत्रीने शाहरुख खानच्या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या इनिंगची सुरुवात केली. आदित्य चोप्रा निर्मित 'फॅन'मध्ये ती दिसली होती. अभिनय, अभ्यास आणि इतर अनेक गोष्टींमध्ये श्रिया पिळगावकर पहिल्या क्रमांकावर आहे.

श्रियाला हिंदी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच आणि जपानी अशा पाच भाषांचे ज्ञान आहे. श्रिया एक प्रोफेशनल सिंगर देखील आहे. ती बीचम हाऊस आणि हाऊस अरेस्ट सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा उभारतानाची दृष्य! पुण्यातील १९२८ ची ऐतिहासिक मिरवणूक, ९७ वर्षांनंतरही... Video पाहा

Ranji Trophy: "मुंबईचा रणजीत धडाका! सहाशे धावांचा डोंगर; सिद्धेशचे दीडशतक, सर्फराझ, शार्दुलचीही अर्धशतके

Teachers Suspended:'अहिल्यानगरमधील दोन परित्यक्ता शिक्षिका निलंबित';बदलीसाठी माेठा बनाव, शिक्षण क्षेत्रात खळबळ..

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा रंगभूमीकडे, लेक आशीचं ‘लैलाज’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

SCROLL FOR NEXT