Shriya Pilgaonkar bollywood Actress  esakal
मनोरंजन

Shriya Pilgaonkar: 'चित्रपटात काम मिळावं म्हणून मी कधीही...' महागुरुंची मुलगी बोलून गेली!

सचिन आणि सुप्रिया यांच्या श्रियानं वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Shriya Pilgaonkar bollywood Actress : टीव्ही मनोरंजन, चित्रपट आणि ओटीटी क्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आता श्रिया पिळगावकरचे नाव घेतले जाते. प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांची मुलगी एवढीच तिची ओळख न राहता तिनं आता स्वताची अनोखी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे.

सचिन आणि सुप्रिया यांच्या श्रियानं वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. तिच्या वेबसीरिजला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात श्रियानं दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आली आहे. श्रिया ही तिच्या बोल्ड अन् बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सध्या श्रियानं नेपोटिझमवर भाष्य करत त्यावर आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये नेपोटिझमवरुन वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. त्यावर कित्येक सेलिब्रेटींनी सणसणीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात आता श्रियाची भर पडली आहे. तिनं देखील या मुद्द्यावर आपली भूमिका व्यक्त करताना तिच्याविषयी मीडियामध्ये, सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरु आहेत त्यावर मत व्यक्त केले आहे.

श्रियानं नुकतेच आपल्या आई वडिलांना मालदीवला नेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गिल्टी माईंड्स, द ब्रोकन न्यूज आणि इश्क ए नादान सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या श्रियानं स्टारकिड असण्यावर परखडपणे मत व्यक्त केले आहे.

श्रिया आपल्या एका मुलाखतीमध्ये म्हणते, मी स्टारकिड आहे म्हणून कधीही कुणाकडे काम मागितले नाही. स्टारकिड कार्डचा वापर केला नाही. मला स्वतला सिद्ध करावे लागले. मी मोठ्या संघर्ष आणि मेहनतीनं ते सिद्ध केले आहे. जेव्हा तुम्ही एका मोठ्या स्टार सेलिब्रेटी कुटूंबातून येता त्यावेळी तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी माझ्याबाबत काही गोष्टी स्पष्टपणे सांगते, ते म्हणजे मी माझ्या अभिनयानं स्वताला सिद्ध करुन दाखवले आहे. प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT