rana and shriya 
मनोरंजन

Video : श्रिया पिळगावकर सांगतेय 'भल्लालदेव'सोबत काम करण्याचा अनुभव

स्वाती वेमूल

'बाहुबली' आणि 'द गाझी अटॅक' यांसारख्या चित्रपटानंतर तेलुगू सुपरस्टार राणा डग्गुबती पुन्हा एकदा 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ अशी तीन भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. यामध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकर एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. श्रियाचा हा पहिलाच तेलुगू, तामिळ चित्रपट आहे. विशेष म्हणजे इतर भाषांमध्ये हा चित्रपट डब न करता त्यांनी ते संवाद स्वत:च म्हटले आहेत. जंगलातील हत्तींची आणि निसर्गाची रक्षा करणाऱ्या वनप्रेमीची भूमिका राणा साकारतोय. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता, सेटवर काय घडलं याबद्दल श्रियाने या मुलाखतीत सांगितलं. 

मराठी चित्रपटसृष्टीत काम कधी करणार, याचंही उत्तर श्रियाने या मुलाखतीत दिलं. त्याचसोबत नागरिक म्हणून आपण वन्यजीवांसाठी आणि निसर्गासाठी काय करतोय, असाही प्रश्न तिने उपस्थित केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT