shruti marathe 
मनोरंजन

'हा तर लस घ्यायचा ड्रेस'; हटके फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल

स्वाती वेमूल

अभिनेत्री श्रुती मराठे नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी साडीतील पारंपरिक लूक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट करणाऱ्या श्रुतीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सेलिब्रिटींच्या फॅशनवर आणि त्यांच्या कपड्यांवर नेटकरी कशा पद्धतीने कमेंट्स करतील याचा काही नेम नाही. याचंच उदाहरण श्रुतीच्या फोटोंवरील कमेंट्स पाहून लक्षात येतं. श्रुतीने नुकतंच ब्लॅक अँड व्हाइट रंगाच्या शर्टमध्ये फोटोशूट केलं. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर पोस्ट केले. श्रुतीचा हा हटके अंदाज अनेकांना आवडला. पण काहींनी त्यावरून श्रुतीला ट्रोलसुद्धा केलं. तिच्या शर्टाची स्टाइल पाहून कोरोना लस घ्यायचा ड्रेस आहे का हा, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला. तर काहींनी श्रुतीला कोरोना लस घेतली का, असा सवाल केला. या कमेंट्सवर श्रुतीने अद्याप कोणतं उत्तर दिलं नाही. 

अनेकांना श्रुतीचा हा ट्रेंडी लूक आवडला असून सर्वसामान्यांपासून काही सेलिब्रिटींनीही तिच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. प्रार्थना बेहरे आणि मानसी नाईक यांनी श्रुतीच्या फोटोंचं कौतुक केलं आहे. तर काहींनी हा लूक खूप 'कूल' आहे, अशीही दाद दिली. 

मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या श्रुतीने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. एका दाक्षिणात्य चित्रपटात श्रुतीने बिकिनी परिधान केला होता. मात्र त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या अनुभवाविषयी तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. "मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता बिकिनी घालून सीन करण्यास होकार दिला. त्यावेळी मी कोणतेही प्रश्न उपस्थित केले नव्हते. पण नंतर त्याच फोटोंवर माझ्यावर टीका झाली. अशा प्रसंगांमुळे तुम्ही कष्टाने कमावलेली प्रतिष्ठा क्षणार्धात मातीमोल होते", असं ती म्हणाली होती. श्रुतीने मराठीतील 'सनई चौघडे' तर तामिळमधील 'प्रेम सूत्र' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती लवकरच प्रवीण तरडे दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात झळकणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT