Shruti Sitara Shruti Sitara
मनोरंजन

‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’ स्पर्धा जिंकणारी श्रुती सितारा पहिली भारतीय

सकाळ डिजिटल टीम

केरळच्या श्रुती सिताराला (Shruti Sitara) ‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’चा ताज मिळाला आहे. श्रुती सहा महिन्यांपासून सौंदर्य स्पर्धेत भाग घेत होती. हा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजिण्यात येणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे कार्यक्रम रद्द करावा लागला होता. यानंतर ऑनलाइन इव्हेंटमध्ये (Online event) विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’ ही स्पर्धा जिंकणारी श्रुती सितारा ही पहिली भारतीय ठरली (first Indian winner) आहे. या स्पर्धेत श्रुतीला मोस्ट इलोक्वेंट क्वीनचा किताबही मिळाला आहे.

२५ वर्षीय श्रुती सितारा ही मूळची केरळची आहे. ती चार ट्रान्सजेंडर व्यक्तींपैकी एक आहे ज्यांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. श्रुतीने केरळ सरकारच्या सामाजिक न्याय विभागात प्रकल्प साहाय्यक म्हणूनही काम केले आहे. इन्स्टाग्राम तिचे १००k फॉलोअर्स आहेत. श्रुती सिताराने ‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’चे विजेतेपद (Miss Trans Global 2021) जिंकल्याची बातमी फॉलोअर्ससोबत शेअर केली आहे.

आनंदी असलेल्या श्रुतीने स्वतःचा मुकुट परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. ‘मिस ट्रान्स ग्लोबल २०२१’चे मुकुट माझ्यासाठी, माझ्या समुदायासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी ही स्पर्धा जिंकू शकेन, असे वाटले नव्हते. जेतेपद पटकावल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, अशी श्रुती सितारा म्हणाली. श्रुतीने आपल्या लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि अनेक मंचांवर भाषणेही दिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT