Shubha lagna savdhan marathi movie coming soon
Shubha lagna savdhan marathi movie coming soon 
मनोरंजन

'शुभ लग्न सावधान' या सिनेमाची छापण्यात आली लग्नपत्रिका!

सकाळवृत्तसेवा

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली. 

मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशिर्वाद देत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख व चुलबुली रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचे लाडिक आग्रहाचे आमंत्रण करताना या पत्रिकेत दिसत आहे.

यामुळे या सर्व लोकप्रिय कलाकारांच्या चाहत्यांना उत्कंठापूर्ण प्रश्न पडला आहे की, 'शुभ लग्न सावधान’ या सिनेमात कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे? त्यांची ही उत्सुकता त्यांना सिनेमागृहात घेवून येणार हे नक्की.

12 ऑक्टोबर 2018 या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत असणाऱ्या 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून संवाद लेखन व दिग्दर्शन या दुहेरी भुमिकेत समीर रमेश सुर्वे यांनी कामगिरी बजावली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT