shubhangi atre Sakal
मनोरंजन

Shubhangi Atre Birthday: करिअरसाठी 11 महिन्याच्या मुलीला सोडलं अन्... शुभांगी अत्रे अशी बनली 'अंगूरी भाभी'

शुभांगी आजच्या काळातील टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.

Aishwarya Musale

'भाभी जी घर पर है' या मालिकेत अंगूरीची भूमिका करणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. शुभांगी आजच्या काळातील टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे, ज्याला लाखो लोक फॉलो करतात. शुभांगीचा जन्म 11 एप्रिल 1981 रोजी मध्य प्रदेशातील पचमढी या सुंदर शहरात झाला. तिने आपले सुरुवातीचे शिक्षणही याच शहरातून केले आणि नंतर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ती इंदूरला आली.

शुभांगीला नेहमीच टीव्ही अभिनेत्री व्हायचं होतं पण मनोरंजन विश्वात तिचं पदार्पण खूप वेगळं होतं. चला, शुभांगी अत्रे यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही माहिती देत ​​आहोत.

शुभांगी अत्रेने 2007 मध्ये बिझनेसमन पीयूष पुरीसोबत लग्न केले. शुभांगीचे सासर मध्य प्रदेशात असले तरी ती पतीसोबत पुण्यात राहत होती. इथेच काही काळानंतर शुभांगीही आई झाली. शुभांगीच्या मुलीचे नाव आशी आहे. शुभांगीला नेहमीच अभिनेत्री बनायचे होते आणि म्हणूनच तिने आई झाल्यानंतर अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला.

शुभांगीने जेव्हा टीव्हीवर पदार्पण केले तेव्हा तिची मुलगी केवळ 11 महिन्यांची होती आणि ती आपल्या मुलीला पुण्यात ठेवून मुंबईत आली. मात्र काही काळानंतर शुभांगी पती पियुष आणि मुलीसोबत मुंबईत राहू लागली.

जेव्हा शुभांगी अत्रेने टीव्ही इंडस्ट्रीत येण्याचा विचार केला तेव्हा तिला या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे अभिनेत्रीने आधी काही मॉडेलिंग असाइनमेंट्स केल्या, ज्यामुळे तिला ऑडिशनची कल्पना आली.

त्याचप्रमाणे हळूहळू शुभांगीने टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. शुभागीने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले. यानंतर ती 'कस्तुरी', 'हवन', 'चिडियाघर' आणि 'दो हंसों का जोड़ा' सारख्या मालिकांसह अनेक हिट मालिकांमध्ये दिसली.

shubhangi atre

शुभांगी अत्रेने अनेक टीव्ही मालिका केल्या पण तिला प्रसिद्ध कॉमेडी शो 'भाबी जी घर पर हैं' मधून प्रसिद्धी मिळाली. शिल्पा शिंदे यापूर्वी या मालिकेत अंगूरीच्या भूमिकेत दिसली होती. पण शिल्पाच्या जाण्यानंतर शुभांगी या व्यक्तिरेखेत दिसली आणि प्रेक्षकांनाही ती आवडली. या शोसाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

एका मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, जेव्हा तिला 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेची ऑफर आली तेव्हा तिच्या पतीला तिने ही मालिका करावी असे वाटत नव्हते. शुभांगीच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीनेच तिला नवीन मालिका करावी असे सुचवले होते. पण अभिनेत्रीने पतीचे ऐकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : 'मत चोरी'सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी विधाने करू नका; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

Latest Marathi News Updates : २५ ऑगस्टला वनतारा माधुरी हत्तीणी प्रकरणाची पुढील सुनावणी होणार

IPL 2026: डेवॉल्ड ब्रेव्हिससाठी CSK ने अंडर द टेबल बरीच रक्कम दिली; आर अश्विनच्या दाव्याने खळबळ, फ्रँचायझीचा सौदा संशयाच्या भोवऱ्यात

Janmashtami Travel Tips: जन्माष्टमीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'या' हिल स्टेशनची सैर, मिळेल आनंद

Karad Crime: वाखाण भागात घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास, शहर पोलिसात फिर्याद दाखल

SCROLL FOR NEXT