Shweta Tiwari 
मनोरंजन

अभिनवने श्वेताकडून बळजबरीने मुलाला घेतलं हिसकावून; घटना सीसीटीव्हीत कैद

'सत्य सर्वांसमोर येऊ दे', म्हणत श्वेताने पोस्ट केला सीसीटीव्ही फुटेज

स्वाती वेमूल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी Shweta Tiwari आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहली Abhinav Kohli यांच्यात सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालूच आहेत. सोमवारी अभिनवने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत श्वेताच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सीसीटीव्ही फुटेज पोस्ट केला आहे. श्वेता राहत असलेल्या इमारतीच्या गार्डनमधील हा सीसीटीव्ही फुटेज आहे. मुलगा रेयांशला घेऊन श्वेता त्या गार्डनमध्ये फेरफटका मारत असताना अभिनव रेयांशला उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. रेयांशला त्याच्याकडे देण्यास श्वेता नकार करते. मात्र तरीही तो बळजबरीने मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात श्वेता मुलाला घेऊन खाली जमिनीवर पडते. हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आणि ही घटना घडत असताना तिथे सोसायटीतील इतर लोक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. (Shweta Tiwari shares CCTV clip of ex husband Abhinav Kohli assaulting her)

श्वेता मुलाला घेऊन जमिनीवर पडल्यानंतरही अभिनवने त्याला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रेयांश त्याच्या वडिलांकडे जायला घाबरतो, असं श्वेताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं. श्वेता मला माझ्या मुलाला भेटू देत नाही असा आरोप अभिनवने केला होता. सीसीटीव्हीचा व्हिडीओ पोस्ट करत श्वेताने लिहिलं, 'आता सत्य समोर येऊ दे. (हा व्हिडीओ माझ्या अकाऊंटवर कायमचा राहणार नाहीये, मी तो नंतर डिलिट करेन. पण सध्या सत्य सर्वांना कळावं म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करतेय.) याच कारणामुळे माझा मुलगा त्याला घाबरतो. या घटनेनंतर जवळपास एक महिना तो घाबरलेला होता. या भीतीमुळे तो रात्री नीट झोपूही शकत नव्हता. दोन आठवडे त्याचा हात दुखत होता. आतासुद्धा तो त्याच्या वडिलांना भेटायला घाबरतो. मी माझ्या मुलाला या मानसिक धक्क्यातून जाऊ देऊ शकत नाही. त्याला शांत आणि आनंदी ठेवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. पण हा भयंकर माणूस माझ्या मुलाचं मानसिक स्वास्थ्य पुन्हा बिघडवू पाहतोय. जर हे शारीरिक शोषण नाही तर अजून काय आहे', असा सवाल श्वेताने केला.

हेही वाचा : मी आतापर्यत किती 'चॅरिटी' केली? सांगतो, बिग बी संतापले

श्वेताच्या या व्हिडीओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 'या व्यक्तीला अटक का नाही केली', असा सवाल निर्माती एकता कपूरने केला. तर रिधिमा पंडित, अश्मित पटेल, किश्वर मर्चंट, सृष्टी रोडे, अनिता हसनंदानी यांनी श्वेताला धीर देण्याचा प्रयत्न केला. 'हे सर्व घडत असताना इतर लोक फक्त उभे राहून बघत आहेत', अशा शब्दांत अभिनेत्री किश्वर मर्चंटने राग व्यक्त केला.

श्वेता-अभिनवमध्ये वादाची ठिणगी कधीपासून?

जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीने २०१३ मध्ये लग्न केलं. २०१६ मध्ये श्वेताने रेयांशला जन्म दिला. त्यानंतर २०१७ पासून या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. २०१९ मध्ये श्वेताने अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. याच वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. मात्र घटस्फोटानंतरही अभिनव आणि श्वेताने सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मुलाच्या संगोपनासाठी अभिनव पैसे देत नसल्याचा आरोप श्वेताने नुकताच केला. त्यानंतर अभिनवने तिच्यावर पैसे घेतल्याचा प्रत्यारोप करत व्हिडीओ पोस्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT