Shweta Tiwari
Shweta Tiwari Google
मनोरंजन

खल्लास! श्वेता तिवारीचा 'किलर लूक' पाहायला चाहत्यांची उडाली झुंबड...

प्रणाली मोरे

वयाची चाळीशी पार केल्यानंतरही कुणी इतकं सुंदर,इतकं फीट कसं राहू शकतं यावर श्वेता तिवारी(Shweta Tiwari) हे उत्तम उदाहरण आहे. तिची 22 वर्षांची मुलगी पलक तिवारीनंही आता मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे. तेव्हापासून पलक आणि श्वेताचे जे काही व्हिडीओ-फोटो शेअर करण्यात आले आहेत त्यात श्वेतानंच बाजी मारलेली दिसून येतेय. अनेकांनी त्या फोटोवर मुलीपेक्षा आईच हॉट दिसतेय अशा कमेंट्स केल्याचंही दिसून आलं होतं. 'खतरों के खिलाडी' मध्येही तिनं आता नुकताच भाग घेतला होता. तेव्हा तिथले तिनं केलेले स्टंट्स आणि त्यावेळचं बोल्ड फोटोशूटही भाव खाऊन गेलं होतं.

श्वेतानं नुकतंच बेज रंगाची म्हणजेच फिकट तपकिरी रंगाची साडी नेसून त्यातील हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. काहीच तासात 2 मिलियनच्या वर या फोटोंना लाइक्स मिळाले आहेत. तिच्या फॅन्सच्या कमेंट्सनाही तिथे पूर आलेला दिसून येतोय. काहींनी लिहिलंय,'किलर लूक' तर काहींनी लिहिलंय,'मार डाला'....तर एकानं थेट श्वेताला म्हटलंय,'कतरिनालाही तू मागे टाकलंयस'. खरंच या फोटोमध्ये श्वेता शोभूनही दिसलीय कतरिनासारखी. पण सर्वात जास्त लक्षवेधक ठरतंय ते श्वेतानं या फोटोला दिलेलं कॅप्शन. तिने थेट लोकांना म्हटलंय,"If you have an opinion about my life, please raise your hand. Now put it over your mouth!"

'कसौटी जिंदगी की' या एकता कपूर निर्मित मालिकेतनं दिसलेली वीशीतली श्वेता वयाच्या चाळीशीतही तितकीच खुलून दिसेतेय यात कोणाचंच दुमत असेल असं वाटत नाही. उलट तिच्या चाहत्यांच्या मते तर वाढत्या वयानुसार तिचं रुप अधिक आता खुलून दिसतंय. टि.व्ही इंडस्ट्रीतली ती एक अशी कलाकार आहे जिचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट देताान सेलिब्रिटीही मागे राहत नाहीत बरं का. आता वयाच्या चाळीशीत तिच्या सदाबहार लूकमुळे तिला एखादा मोठा हिंदी सिनेमा ऑफर झाला तर नवल नव्हे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT