shyamchi aai movie Chadi Lage Cham Cham song out now starring om bhutkar diwali 2023 SAKAL
मनोरंजन

Shyamchi Aai: सगळ्यांचं आवडतं गाणं पुन्हा भेटीला! 'छडी लागे छम छम' गाणं नव्या अंदाजात रिलीज

लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांच्या परिचयाचं छडी लागे छम गाणं भेटीला

Devendra Jadhav

Shyamchi Aai Chadi Lage Cham Cham Song: श्यामची आई सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. श्यामची आई सिनेमा अवघ्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. श्यायची आई सिनेमातलं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

हे गाणं लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांच्या परिचयाचं आहे. ते गाणं म्हणजे छडी लागे छम छम. छडी लागे छम छम गाणं नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

(shyamchi aai movie Chadi Lage Cham Cham song out now starring om bhutkar diwali 2023)

श्यामची आई सिनेमातलं छडी लागे छम छम गाणं भेटीला

सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई सिनेमातलं छडी लागे छम छम गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्याचा आनंद घेऊन पुन्हा एकदा सर्व लोकं बालपणीच्या आठवणीत नक्कीच रमतील यात शंका नाही.

अशोक पत्की यांनी नव्या अंदाजात हे गाणं संगीतबद्ध केलंय. हे गाणं ऐकुन पुन्हा एकदा जुना काळ जगल्यासारखा वाटतोय. आता हे गाणं सिनेमात ऐकण्यास वेगळीच मजा असेल यात शंका नाही.

श्यामची आई सिनेमातले कलाकार

'श्यामची आई' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,

सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

श्यामची आई सिनेमाची रिलीज डेट

बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.

साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. १० नोव्हेंबर २०२३ ला श्यामची आई सिनेमाचा कृष्णधवल ऐतिहासिक अनुभव प्रेक्षकांना घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT