shyamchi aai movie teaser out now om bhutkar gauri deshpande released on diwali 2023 SAKAL
मनोरंजन

Shyamchi Aai Teaser: दिवाळीत उलगडणार संस्कारांची पानं! श्यामची आई सिनेमाचा पहिला टीझर भेटीला

श्यामची आई या मराठी सिनेमाचा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Shyamchi Aai Teaser News: गेल्या अनेक दिवसांपासून श्यामची आई या मराठी सिनेमाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अखेर श्यामची आई सिनेमाची पहिली झलक अर्थात सिनेमाचा पहिला टीझर भेटीला आलाय.

श्यामची आई सिनेमाच्या टीझर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असून श्यामची आईच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलंय. जाणून घेऊया.

(shyamchi aai movie teaser out now)

तुम्हाला कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात खोडकर श्याम आणि त्याची मायेनं शिस्त लावणारी आई दिसतेय. चित्रपटाचा टीजर पहिलात तर अनेक वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यासमोर तंतोतंत उभा करतोय. चित्रपटातील कलाकारांचे लूक्स, सेट, संवाद ते अगदी संगीत अशा साऱ्या गोष्टींना गोल्डन टच दिलेला पदोपदी जाणवतोय.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाच्या टीझरने सिनेमाविषयीची उत्सुकता आणखीन चाळवली गेलीय.

'श्यामची आई' या चित्रपटात ओम भूतकर यांनी साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर,

सारंग साठ्ये,उर्मिला जगताप,अक्षया गुरव, दिशा काटकर,मयूर मोरे ,गंधार जोशी , अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.

बहुचर्चित 'श्यामची आई' या चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे तर सुपरहिट 'पावनखिंड' चित्रपटाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर , आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.

साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे. १० नोव्हेंबर २०२३ ला श्यामची आई सिनेमाचा कृष्णधवल ऐतिहासिक अनुभव प्रेक्षकांना घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

अक्कलकोटच्या सीमावर्ती गावांमध्ये हातभट्टीचा महापूर! ‘एक केटी दे’ म्हटले की मिळते हातभट्टी, विषारी ताडी; पोलिसांच्या आऊट पोस्टजवळच विषारी ताडी विक्री

Milk Rate Increase : शेतकऱ्यांना दिलासा! पुणे जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT