Siddharth Mithali's second honeymoon, see where the two have gone ..  sakal
मनोरंजन

सिद्धार्थ मितालीचा सेकंड हनिमून, पाहा कुठे गेलेत दोघं..

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मायेकर सध्या 'या' ठिकाणी परदेश वारीसाठी गेले आहे.

नीलेश अडसूळ

मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). त्यांचे प्रेम, लग्न आणि सोशल मीडियावर येणारे फोटो यामुळे या जोडीने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे. गेल्या वर्षी ते लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात अत्यंत दिमाखात हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच दोघांनी मुंबईत स्वतःचे घर विकत घेतले. आता त्या दोघांनीही एक महत्वाची पोस्ट शेअर केले आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले. सिद्धार्थ आणि मिताली आपल्या सेकंड हनिमूनसाठी परदेशी रवाना झाले आहेत. (Siddharth chandekar and Mithali mayekar has gone for second honeymoon)

सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनीही आपल्या isntagram स्टोरीवर याची माहिती दिली आहे. सिद्धार्थने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवरील फोटो शेअर केला आहे. तर मितालीने लवकरच मुंबईत परत येऊ असं कॅप्शन देऊन विमानातील फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत ती म्हणते, 'आम्ही कुठे जातोय हे ठाऊक आहे का.. मग त्यासाठी 16 तास वाट बघा..' त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सिद्धार्थ मिताली या जोडीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. या पोस्टवरून दोघेही सेकंड हनिमूनला गेले आहेत असा तर्क अनेकांनी लावला आहे. पण ते नेमके कुठे गेले आहेत आणि कशासाठी हे लवकरच कळेल.

सिद्धार्थ चांदेकरचा 'झिम्मा' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. लॉकडाउन नंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले होते. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव या दिग्गज अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT