Siddhart chandekar gives wife Mitali mayekar a taste of espresso coffee sakal
मनोरंजन

Siddharth-Mitali: सिद्धार्थनं मितालीला असं काय दिलं प्यायला की तिची अवस्था नवऱ्याला खाऊ की गिळू अशी झाली..

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल..

नीलेश अडसूळ

Siddharth chandekar and Mitali mayekar viral video: मराठी मनोरंजन विश्वातील गाजलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). त्यांचे प्रेम, लग्न आणि सोशल मीडियावर येणारे फोटो यामुळे या जोडीने मोठा चाहता वर्ग मिळवला आहे.

ते दोघेही सोशल मीडिया वर प्रचंड सक्रिय आहेत. सिद्धार्थ हा उत्तम अभिनेता आहे. त्याने केलेल्या मालिका आणि चित्रपट कायमच लक्षात राहतात. तर मितालीही गुणी अभिनेत्री आहे. तिने आजवर मालिका आणि चित्रपटामधून स्वतःला पुढे आणले आहे.

सध्या ही जोडी परदेशात धमाल करत आहे. मिताली आणि सिद्धार्थ स्पेन मध्ये वॅकेशन साठी गेले आहेत. तिथून मितालीचा एक व्हिडिओ सिद्धार्थने शेयर केला आहे. ज्याची आता प्रचंड चर्चा सुरू आहे.

(Siddharth chandekar gives wife Mitali mayekar a taste of espresso coffee)

सिद्धार्थने (siddharth chandekar) एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये मिताली आणि तो एका ठिकाणी निवांत बसले आहेत. त्यावेळी सिद्धार्थ मितालीला काहीतरी प्यायला देतो, ते पिऊन मिताली तोंड वाकडं करते. एवढचं नाही तर त्या पदार्थाची चव चाखून मितालीचा चेहरा उतरतो. ती वेडेवाकडे हावभाव करते. सिद्धार्थला आता खाऊ का गिळू अशी तिची अवस्था होते.

सोबत सिद्धार्थने या व्हिडिओला एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. 'आता हिला कडू औषध द्यायची वेळ झाली' असं तो म्हणाला आहे.

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर सिद्धार्थने कोणता बरं पदार्थ तिला दिला असेल असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण सिद्धार्थनेच याचं उत्तर दिलं आहे.. मिताली मयेकरला (mitali mayekar) त्याने जगातील सर्वाधिक कडू कॉफी म्हणून ओळखली जाणारी एसप्रेसो कॉफी दिली आहे.

ही कॉफी सिद्धार्थ पित असतो , पण सहज तो एक घोट मितालीला प्यायला देतो आणि तिचा चेहराच बघण्यासारखा होता. हा व्हिडिओ सिद्धार्थने सोशल मीडियावर शेयर केला आहे. तो सध्या बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT