Siddharth Chandekar, Siddharth Chandekar news, Siddharth Chandekar mitali mayekar viral video, Siddharth Chandekar video, Siddharth Chandekar wife SAKAL
मनोरंजन

Siddharth Chandekar Video: उन्हाळयात बायकोच्या या अजब गोष्टीमुळे सिद्धार्थचा घाम फुटला, सर्वांसमोर तक्रार

सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

Devendra Jadhav

Siddharth Chandekar - Mitali Mayekar Viral Video News: सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात कडाक्याचा उन्हाळा आहे. अनेक जण गरमीमुळे हैराण झाले आहेत. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या घरी मात्र एक अजब गोष्ट घडलीय.

सिद्धार्थची बायको मितालीने एक अशी गोष्ट केलीय त्यामुळे सिद्धार्थचा खऱ्या अर्थाने घाम फुटलाय. सिद्धार्थने थेट व्हिडिओ बनवत बायको मितालीचा अजब पराक्रम सर्वांना सांगितलाय.

(Siddharth chandekar sweats because of his wife's mitali mayekar strange behavior in summer)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सिद्धार्थने मितालीला उन्हाळ्यानिमित्त ७ - ८ ताक मागवायला सांगितले होते. तर मितालीने ७ - ८ ताक न मागवता थेट ८ लिटर ताकाचा मोठा बॉक्स मागवला. त्यामुळे सिद्धार्थ हैराण झाला. सिद्धार्थने ताकाच्या बॉक्सचा व्हिडिओ सर्वांना दाखवला.

त्याने पुढे व्हिडिओमध्ये मितालीला विचारलं. मिताली म्हणाली, ८ लॉटरी ताक मागवायला सांगितलं होतं.

आता एवढी गरमी आहे तर पिऊ आपण दोघे. Hydrated राहू. असं म्हणत मिताली आतल्या खोलीत IPL बघायला निघून गेली.

पुढे सिद्धार्थने सर्वांना सांगितलं. माझ्याकडे आहेत आता खूप ताक. कोणाला हवे असतील तर सांगा. असं शेवटी सिद्धार्थ काकुळतीला येऊन म्हणाला. सिद्धार्थच्या या व्हिडिओवर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.

क्षिती जोग म्हणाली.. होतं रे असं कधीकधी.

अभिनेता अमेय बर्वे म्हणाला.. नाशिकवरून गुळाच्या जिलेब्या मागवतो.. होऊन जाऊ द्या बेत.. अशा कमेंट करत सेलिब्रिटींनी सिद्धार्थ - मितालीच्या व्हिडिओवर धम्माल कमेंट केल्या आहेत.

सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला झिम्मा सिनेमा प्रचंड गाजला होता.

याच झिम्मा सिनेमाच्या पुढच्या भागात सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT