siddharth jadhav johny lever aflatoon marathi movie released on 21 july  SAKAL
मनोरंजन

Aflatoon Movie: सिद्धू आणि जॉनी लिव्हरच्या कॉमेडीची जुगलबंदी, 'अफलातुन' मराठी सिनेमा

अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Devendra Jadhav

Aflatoon Marathi M,ovie News: जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही,

एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट.

(siddharth jadhav johny lever aflatoon marathi movie released on 21 july)

लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत.

ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरवरून अफरातफरी ची गडबड लक्षात येते आहे. पण ही अफरातफरी नेमकी कसली आहे? आणि कशारीतीने ती सोडवली जाणार?

याचा धमाल अनुभव देणार ‘अफलातून’ हा चित्रपट आहे. एका अशक्य केसची अफलातून स्टोरी, पडद्यावर बघायला नक्की गंमत येणार आहे.

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे.

मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत.ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत. येत्या २१ जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT