siddharth jadhav new movie ulgulan announcement on the siddharth jadhav birthday SAKAL
मनोरंजन

Siddharth Jadhav: "आयुष्यातला महत्त्वाकांक्षी चित्रपट", वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने केली नवीन सिनेमाची घोषणा

सिद्धार्थ जाधवने त्याच्या वाढदिवशी नवीन सिनेमाची घोषणा केलीय

Devendra Jadhav

Siddharth Jadhav News: आज सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस. सिद्धार्थने आजवर अनेक हिंदी - मराठी सिनेमांंमधून स्वतःचं नाव कमावलंय. सिद्धार्थच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

आज सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याला त्याचे जगभरातील फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतील. अशातच सिद्धार्थने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केलीय.

(siddharth jadhav new movie ulgulan announcement on the siddharth jadhav birthday)

दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी नवीन सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमाचं नाव आहे उलगुलान. गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या तृशांत इंगळे दिग्दर्शित "झॉलीवूड" या चित्रपटातून झाडीपट्टी रंगभूमीची चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा अनेक कारणांमुळे ह्या चित्रपटाला दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवली होती.

आता तृषांत यांनी सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत उलगुलान सिनेमाची घोषणा केलीय.

"उलगुलान " 
दिवस ऑक्टोबर "२३"
साल दोन हजार "२३"
कारकीर्दीचं वर्ष "२३"
आयुष्यातला एक महत्त्वाकांक्षी चित्रपट घेऊन येतोय....
असच प्रेम असुद्या...
"उलगुलान" च्या नावानं चांगभलं.

असं कॅप्शन देत सिद्धार्थने नवीन सिनेमाची घोषणा केलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT