Siddharth Kiara Wedding  esakal
मनोरंजन

Siddharth Kiara Wedding : वाजंत्री वाजवा! कियारा-सिद्धार्थचं 'शुभमंगल', शेरशाहचा शाहीविवाह सोहळा!

बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Siddharth Kiara Wedding bollywood celebrities rajasthan wedding : बॉलीवूडचं प्रसिद्ध जोडपं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा होती. अखेर ते विवाहबंधनात अडकले आहेत. एएनआयनं ट्विट करुन त्याबाबत अधिकृत माहितीही दिली आहे.

लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं घेतली होती. सकाळपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लग्नबंधनात अडकणार आहेत. या अविस्मरणीय क्षणासाठी या बॉलिवूड स्टार्सनी राजस्थानमधील जैसलमेरची निवड केली होती.

कियारा आणि सिद्धार्थ 7 फेब्रुवारीला संध्याकाळी जैसलमेरची शान असलेल्या सूर्यगढ हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नासाठी या स्टार्सनी सूर्यगढ पॅलेसच्या 80 रूम्स बुक केल्या होत्या. डेस्टिनेशन वेडिंगसाठी या पॅलेसचे भाडे 1 कोटी 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका खोलीचे भाडे दोन लाख रुपयांपर्यंत आहे. रॉयल रूमबद्दल बोलायचे झाले तर त्याचे भाडे एक कोटी रुपयांपर्यंत आहे.

या राजवाड्यात नील नावाचा एक सुंदर जलतरण तलाव देखील आहे, जो संथ प्रकाशात तलावाचे निळे पाणी प्रकाशित करतो आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना रॉयल बाथचा फील देतो. सूर्यगढचा राजशाही डायनिंग हॉल प्राचीन कटलरी आणि फर्निचरने सजलेला आहे.

पॅलेसची जीमही अनोखी आहे. त्याचे नाव आखाडा असून आधुनिक यंत्रसामग्रीसह देशी मुगदारही येथे उपलब्ध आहे. लेक गार्डन्स येथे राहणाऱ्यांसाठी संध्याकाळ अधिक रोमांचक बनवते. येथे लोक त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांसह सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"तो गेला तेव्हा मी इथे नव्हतो" अतुल परचुरेंना शेवटचं न भेटल्याबद्दल दिगंबर यांनी व्यक्त केली खंत

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Latest Marathi News Live Update : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते कांदिवली लोखंडवाला १२० फूट डीपी रोडचे भूमिपूजन

Varuthini Ekadashi 2026: वरूथिनी एकादशीला शिवलिंगावर अर्पण करा 'या' ५ वस्तू; घरातील गरिबी दूर होऊन येईल पैसाच पैसा!

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT