Siddharth Kiara wedding
Siddharth Kiara wedding Esakal
मनोरंजन

Siddharth Kiara wedding: करण जोहरनं दिलं सिद्धार्थ कियाराला लग्नाचं तगडं गिफ्ट...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचे पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे लग्न झाल्यापासून सोशल मिडियावर त्याचीच चर्चा आहे. या जोडप्याने 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड फोर्ट पॅलेसमध्ये लग्न केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे पाहिल्यानंतर चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

करण जोहरपासून कंगना राणौतपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या जोडप्याचे कौतुक केले आहे. आता करण जोहर त्याच्या आवडत्या कपल सिड-कियाराला लग्नानंतर मोठी भेट दिली असल्याच बोललं जात आहे. चित्रपटाच्या पडद्यावर जोडी साकारल्यानंतर आता खऱ्या आयुष्यातील या सुपरहिट जोडीने एक-दोन नव्हे तर तीन चित्रपट साइन केले आहेत. होय, करण जोहरने सिद्धार्थ कियाराला त्याच्या आगामी तीन चित्रपटांसाठी साइन केल्याची बातमी आहे.

'शेरशाह' चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना सिद्धार्थ-कियाराची जोडी पसंतीस पडली आहे. शेरशाह चित्रपटाच्या सेटवर दोघांनी रोमान्स केला. सिड-कियाराची रील लाइफ केमिस्ट्री आणि पडद्यावरचे प्रेम याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता करण जोहर या हिट कपलला त्याच्या चित्रपटासाठी साईन करणार आहे.

बॉलीवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांना शशांक खेतानच्या नवीन चित्रपटासाठी साइन केले आहे. हा प्रकल्प वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या 'बद्री की दुल्हनिया' या फ्रेंचायझीच्या धर्तीवर असेल.

एका मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट निर्माता करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीला त्याच्या तीन चित्रपटांसाठी साइन केले आहे. या जोडप्याने त्यांचा आवडता निर्माता करण जोहरसोबत करार केला आहे आणि लग्नानंतर ते त्याच्यासोबत काम करतील. असा दावा करण्यात येत आहे. दोघांचा हा प्रोजेक्ट वरुण धवन आणि आलिया भट्टच्या 'दुल्हनिया' फ्रँचायझीच्या आधारावर असेल अशीही बातमी आहे.

करण जोहरच्या बॅनरखालील 'हम्प्टी' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्ये ज्याप्रकारे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचा जोडींचा रोमान्स पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचे हे चित्रपटही पाहायला मिळतील. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्याच्या योद्धा चित्रपटात व्यस्त आहे आणि कियारा अडवाणी देखील 'सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात व्यस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT