siddharth pithani on sushant 
मनोरंजन

सुशांतच्या भावजींसोबतचं व्हॉट्सअप चॅट सिद्धार्थ पिठानीने केलं शेअर, वाचा काय झालं होतं संभाषण..

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये वेगळं वळण आलं जेव्हा सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. मात्र त्यानंतर एकामागोमाग अनेक वेगवेगळे खुलासे होत गेले. आता पुन्हा एकदा सुशांतच्या वडिलांनी जेव्हा ३ ऑगस्टला एक व्हिडिओ शेअर केला तेव्हाही खळबळ उडाली.या व्हिडिओमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप लावत सांगितलं की त्यांनी २५ फेब्रुवारीला पोलिसांना सूचना दिली होती की सुशांतच्या जीवाला धोका आहे मात्र तरीही मुंबई पोलिसांनी काही केलं नाही. आता काही व्हॉट्सअप चॅट्सचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत ज्यामधील काही मेसेज मुंबई पोलिसांना पाठवले गेले होते. यावर मुंबई पोलिसांनी उत्तर देत म्हटलं की सुशांतच्या कुटुंबाला आम्ही सांगितलं होतं की या प्रकरणी तुम्ही लेखी तक्रार द्या मात्र त्यांनी असं केलं नाही.

आता सुशांतसोबत राहिलेल्या सिद्धार्थ पिठानीने काही व्हॉट्सअप मेसेज रिलीज केले आहेत जे सुशांतच्या भावजींनी पाठवले होते. एका रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की हे मेसेज तेव्हा पाठवले गेले होते जेव्हा सुशांतच्या कुटुंबाचा त्याच्यासोबत संपर्क होऊ शकत नव्हता. हे देखील म्हटलं जात होतं की सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्यासोबत जे राहत होते त्यांच्यामुळे ते खुश नव्हते. सुशांतच्या कुटुंबियांना त्याला संपर्क करण्याचा प्रयत्नही केला होता मात्र त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही.

यानंतर सुशांतचे भाऊजी ओपी सिंग यांनी सिद्धार्थ पठानीला मेसेज केले होते जो सुशांतसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. मेसेज खालीलप्रमाणे होते-

१. चंदीगढला पोहोचलो आहे. मला मुंबईला बोलवल्याबद्दल धन्यवाद. यामुळे मला माझ्या जुन्या मित्रांची आठवण झाली. 

२. मी या गोष्टीचं कौतुक करतो की तु आयुष्याचा, करिअरचा आणि घराचा इंचार्ज नाही आहेस. मला आनंद आहे की मी परिस्थितीचा योग्य अंदाज लावला आणि त्याप्रमाणेच माझा प्रवास आखला.

३. कृपया माझ्या पत्नीला स्वतःच्या समस्यांपासून लांब ठेव. तुझी संगत, वाईट सवयी, चुकीचं मॅनेजमेंटच्या कारणामुळे मी हे निश्चित करु इच्छितो की माझ्या पत्नीला यामुळे त्रास होऊ नये कारण ती खूप चांगली आहे.

४. मीच आहे जो तुझी मदत करु शकतो. मी आत्ताही तुझ्यासाठी उपलब्ध आहे. कोणत्याही गरजेच्या वेळी, तुझी काळजी करणारे जे कोणी आहेत, तुझी गर्लफ्रेंड, तिचं कुटुंब किंवा तुझे मॅनेजर माझ्या ऑफीसमध्ये संपर्क करु शकतात. 

५. तुला हे सगळं जर वायफल वाटत असेल तर तु याकडे दुर्लक्ष करु शकतोस. 

सुशांत प्रकरणाची तपासणी मुंबई पोलिसांसोबतंच बिहार पोलीस देखील करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांवर या प्रकरणात निष्काळजीपणा करत असल्याचे आरोप लावले जात आहेत. तर दुसरीकडे अजुनही सीबीआय तपासाची मागणी होत आहे. 

siddharth pithani shares messages sushant singh rajput got from his brother in law

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT