Sidharth Malhotra hurt on Indian Police Force set,
Sidharth Malhotra hurt on Indian Police Force set, Google
मनोरंजन

Indian Police Force: ॲक्शन सीन करताना सिध्दार्थ मल्होत्रा जखमी

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) गेल्या काही दिवसांत आपली नवीन वेबसिरीज 'इंडियन पुलिस फोर्स' मुळे चांगलाच चर्चेत आहे. रोहित शेट्टी(Rohit Shetty) दिग्दर्शित या सीरिजचं शूटिंग गोव्यात सुरु झालं आहे. पण आता या सीरिज संदर्भात मोठी बातमी कानावर पडत आहे ती म्हणजे शूटिंग दरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा जखमी झाला आहे. एका अॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थ जखमी झाल्याचं वृत्त आहे.

सिद्धार्थने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही बातमी स्वतः शेअर केली आहे. सिद्धार्थने शूटिंगच्या सेटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या हाताला लागलेली ती जखम दाखवत आहे. हा व्हि़डीओ शेअर करत त्यानं लिहिलं आहे,''रोहित शेट्टीच्या मते असली हिरो तुम्ही तेव्हाच जेव्हा तुम्ही खरा घाम गाळता आणि खरं रक्त तुमचं वाहतं. रोहित सर गोव्यात अशाच जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सचं शूट करुन घेत आहेत''. सिद्धार्थची ती पोस्ट आम्ही बातमीत जोडलेली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करीत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'इंडियन पुलिस फोर्स' ही सीरिज आपण पाहू शकणार आहोत. यामध्ये शिल्पा शेट्टी,विवेक ओबेरॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तो आपल्याला 'शेरशाह' सिनेमांतून दिसला होता. त्या सिनेमात त्याच्या भूमिकेचं कौतूकही झालं होतं. आता सिद्धार्थ आपल्याला रश्मिका मंदानासोबत 'मिशन मजनू' सिनेमात दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICU मध्ये आजारी वडिलांसमोर लागले दोन मुलींचे लग्न, डॉक्टर-नर्स झाले वराती, नंतर... डोळे पाणावणारी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले! केंद्रीय गृहमंऱ्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत घेतला परिस्थितीचा आढावा

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

"महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर लँड जिहाद," भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rahul Gandhi : 'ईव्हीएम हे ब्लॅक बॉक्स...'; लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी पुन्हा उपस्थित केला प्रश्न

SCROLL FOR NEXT