Sidharth-Kiara Esakal
मनोरंजन

Sidharth-Kiara: अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड..

सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि सर्व विधी 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कपल म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याकडे पाहिले जाते. मागील काही दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र यासर्व अफवा असल्याच सांगितलं जात होत मात्र आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या तयारी जोरात सुरू झाली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत आणि सर्व विधी 5 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 8 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.

'आज तक'च्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार आहे. लग्नासाठी 100 ते 125 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चनपासून शाहरुख खान, करण जोहर आणि वरुण धवनपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

सूर्यगढ पॅलेसमधील लक्झरी व्हिला पाहुण्यांसाठी बुक करण्यात आले आहेत. लग्नाच्या तयारीची जबाबदारी मुंबईतील एका मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. 4 फेब्रुवारीपासून सूर्यगढ पॅलेसमध्ये वऱ्हाडी पोहोचण्यास सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर कियारा अडवाणी अलीकडेच दिल्लीला जाताना दिसली तर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आधीच दिल्लीत पोहोचला आहे. सिद्धार्थ आणि कियारा पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहेत. वृत्तानुसार जैसलमेरमध्ये लग्न झाल्यानंतर हे जोडपे मुंबईत ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन ठेवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: मोहन भागवतांच्या 'जेन-झीं'बद्दलच्या विधानावर अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया; भाजपला कानपिचक्या, म्हणाले...

CM विजयचा मोठा निर्णय! आता मोबाईलवरूनच दारूची बुकिंग करता येणार; कमी पैशात दारू मिळणार?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

जिनिलिया देशमुख मुलांना जेवणात 'ही' गोष्ट आवर्जून देतेच; म्हणते- दररोज एक चमचा खाणं कम्पलसरी...

Pension Issue : पुणे जिल्ह्यात तीन महिन्यांपासून दिव्यांग, निराधारांची पेन्शन रखडली

SCROLL FOR NEXT