sidharth and kiara  Sakal
मनोरंजन

Sidharth Kiara Wedding: वरुण धवनपासून ते कतरिनापर्यंत, या सेलिब्रिटींनी सिड-कियाराला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीही सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मंगळवारी म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिड आणि कियाराने लग्न केलं आहे .

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटीही सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाबद्दल बी-टाऊनचे सेलिब्रिटीही अभिनंदन करत आहेत. करण जोहर, मनीष मल्होत्रा ​​ते भेडिया अभिनेता वरुण धवन यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच वरुण धवनने लिहिले आहे की, "विशिंग यू ए लाइफ टाइम ऑफ लव्ह."

Varun Dhawan

करण जोहरने देखील कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचवेळी करणने इंस्टाग्रामवर या जोडप्यासाठी एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे.

डिझायनर मनीष मल्होत्राने ​​देखील कियारा आणि सिद्धार्थ यांना त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, "सुंदर जोडी मिसेस आणि मिस्टर मल्होत्रा ​​यांना खूप प्रेम आणि आशीर्वाद."

कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्मान खुराना यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, या सर्व चित्रपटातील व्यक्तिमत्त्वांनी सिड-कियाराला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif
Vicky Kaushal

गेल्या दोन दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये उपस्थित होते. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाआधीचे फंक्शन 5 फेब्रुवारीपासून सुरू झाले आणि 7 फेब्रुवारीला त्यांचे लग्न झाले.

या जोडप्याने जैसलमेरमध्ये लग्नाचे सात फेरे घेऊन डेस्टिनेशन वेडिंगचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिड आणि कियारा शेरशाह चित्रपटानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि आता त्यांनी त्यांच्या नात्याला लग्नाचे नाव दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT