Sidharth malhotra s role in Jabariya jodi praises by fans  
मनोरंजन

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'जबरिया' अंदाजाची चर्चा

वृत्तसंस्था

सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा स्टारर 'जबरिया जोडी'चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यातील सिद्धार्थ मल्होत्राच्या अभय सिंह या बिहारी व्यक्तिरेखेची चर्चा होतीये. सिद्धार्थचे हे कॅरॅक्टर बिहारमधील एका खऱ्या व्यक्तिसारखे घेतले असल्याची ही चर्चा सुरू आहे. तसेच परिणीती चोप्राची तिखी छोरीवाली भूमिका हे या चित्रपटाचे आकर्षण आहे.

सिद्धार्थने या चित्रपटातील त्याचा एक खास सीन ट्विट केला आहे. 'हम बस एक्झाम सेंटर तक पहुचा देंगे एक्झाम तो टॉपर्स खुद ही लिखेगा' असे कॅप्शन या व्हिडिओला दिलंय.

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात असलेले हुंड्याचे प्रस्थ आणि त्याला विरोध करणारा अभयसिंह आणि त्याच्याच तोडीची बिनधास्त अशी परिणीती यांच्या लव्हस्टोरीवर आधारित हा चित्रपट आहे. हुंडा घेणाऱ्या नवरदेवांना अभयसिंह धडा शिकवत असतो, त्याला राजकारणाची आवडही असते. अशातच तो परिणीतीच्या प्रेमात पडतो, मग पुढे काय होते? हे या चित्रपटात बघावे लागेल. 'दहेज के लालचियों की जबरिया जोडी' असा त्याचा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे.

सिद्धर्थ-परिणीतीसह अपराजित खुराना, जावेद जाफ्री यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रशांत सिंह हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'जबरिया जोडी' हा चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT