Shehnaaz Gill and Asim Riaz
Shehnaaz Gill and Asim Riaz  file
मनोरंजन

शहनाजच्या डान्स व्हिडीओवर असिमची कमेंट; सिद्धार्थ शुक्लाचे चाहते भडकले

स्वाती वेमूल

'बिग बॉस १३' फेम असिम रियाजच्या (Asim Riaz) एका ट्विटवर शहनाज गिल (Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla ) चाहते चांगलेच भडकले आहेत. कारण या ट्विटद्वारे असिमने शहनाजला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलने तिच्या मॅनेजरच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने इतर सेलिब्रिटींसोबत मिळून डान्स केला. शहनाजच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावरून असिमने तिला टोला लगावला आहे. 'काही लोक त्यांच्या प्रिय व्यक्तींना खूप लवकर विसरतात', असं असिमने म्हटलंय. त्याने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लावरून शहनाजला हा टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सिद्धार्थच्या चाहत्यांनी असिमला चांगलंच ट्रोल केलं आहे,

'आताच काही डान्सचे व्हिडीओ क्लिप्स पाहिले. खरंच काही लोक त्यांच्या प्रिय व्यक्तींना खूप लवकर विसरतात. क्या बात, क्या बात..', असं ट्विट असिमने केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने #Newworld असा हॅशटॅग दिला आहे. 'जर हे ट्विट शहनाजसाठी असेल तर मला असिमची कीव येते. इतरांवर अशा पद्धतीची टिप्पणी करण्याचा त्याला कोणताच अधिकार नाही. शहनाज स्वत:चं आयुष्य जगू शकत नाही का?', असा सवाल एका नेटकऱ्याने केला. तर 'या ट्विटची काहीच गरज नव्हती. जर ती पहिल्यासारखी आनंदी राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की ती सिद्धार्थला विसरली', असं दुसऱ्याने म्हटलं. 'असं ट्विट करताना तुला लाज वाटली पाहिजे', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी असिमला सुनावलं.

'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं सप्टेंबरमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाजने कुठल्याही कार्यक्रमात जाणं किंवा माध्यमांसमोर येणं टाळलं होतं. कार्यक्रमातील शहनाजचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. 'तिला पुन्हा हसताना पाहून बरं वाटतंय', असं एकाने लिहिलं. तर 'तू अशीच हसत रहा' असं दुसऱ्याने म्हटलं. इशान खट्टरच्या 'धडक' या चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर सर्व सेलिब्रिटी नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. 'सिडनाज' असं नाव या दोघांच्या चाहत्यांनी त्यांना दिलं होतं. सिद्धार्थसाठीचा शहनाजचा 'तू यही है' हा म्युझिक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थच्या अनेक आठवणी चाहत्यांना पहायला मिळाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT