'साप मेला असेल'; सलमानसाठी रविना टंडनची पोस्ट चर्चेत

पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला.
Raveena Tandon, Salman Khan
Raveena Tandon, Salman Khan

वाढदिवसाच्या दोन दिवस आधी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) शनिवारी पहाटे ३च्या सुमारास त्याच्या पनवेलमधील वाजेपूर या गावातील फार्महाऊसमध्ये सर्पदंश झाला. सलमानने नुकताच त्याचा ५६वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याच्यासाठी पोस्ट लिहित त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री रवीना टंडननेही (Raveena Tandon) सलमानसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सलमानसोबतचे फोटो पोस्ट करत तिने सर्पदंशाच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. रवीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सर्पदंशानंतर सलमानला कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला रविवारी सकाळी ९ला घरी सोडण्यात आलं.

रवीना टंडनची पोस्ट-

'माझ्या पहिल्या हिरोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमीच माझ्यासाठी खास राहशील. तुझा प्रेमळ स्वभाव, इतरांची काळजी घेणं, आपली भांडणं या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप खास आहेत. तुझ्या आयुष्यात प्रेम आणि आनंद सतत राहू दे. आणि हो.. तुला आशीर्वाद मिळाला आहे. साप मेला असेल', अशी मजेशीर पोस्ट रवीनाने लिहिली. तिने सलमानसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

Raveena Tandon, Salman Khan
..अन् लेकीसाठी अमृता-सैफच्या डोळ्यात आलं पाणी

सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये मुक्कामास आहेत. शनिवारी रात्री ख्रिसमस सेलिब्रेशननंतर तो आणि त्याचे काही मित्र गप्पा मारत मारत होते. त्यावेळी सलमानच्या हाताला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचं कळताच त्याच्या खासगी डॉक्टरांच्या पथकाने कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर त्याला बिनविषारी सापाने दंश केल्याचं निष्पन्न झालं. जवळपास सहा तास रुग्णालयात राहिल्यानंतर आता ठीक असल्याचं सलमानने स्पष्ट केलं.

१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पत्थर के फूल' या रवीनाच्या पहिल्या चित्रपटात तिने सलमानसोबत काम केलं होतं. त्यानंतर ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र झळकली. 'अंदाज अपना अपना', 'कहीं प्यार ना हो जाए' यांसारख्या चित्रपटांमध्ये सलमान-रवीनाने काम केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com