Sidhu Moose Wala Latest News Sidhu Moose Wala Latest News
मनोरंजन

Sidhu Moose Wala : मुसेवाला हत्याकांडातील पाचव्या शूटरसह दोन साथीदारांना अटक

याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच ट्विट करून दिली

सकाळ डिजिटल टीम

Sidhu Moose Wala Latest News पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील पाचव्या शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती पंजाब पोलिसांनीच ट्विट करून दिली आहे. डीजीपी, पंजाब पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. ‘पंजाब पोलिसांनी केंद्रीय एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील फरार शूटर दीपक मुंडीला दोन साथीदारांसह अटक केली’ असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेनुसार ड्रग्ज आणि गुंडांविरुद्धच्या युद्धात मोठा विजय मिळाला आहे. दीपक, कपिल पंडित आणि राजिंदर यांना आज एजीटीएफ टीमने पश्चिम बंगाल-नेपाळ सीमेवर गुप्तचर कारवाईत अटक केली. दीपक बोलेरो मोड्यूलमध्ये शूटर होता. त्याच वेळी कपिल पंडित आणि राजिंदर यांनी शस्त्रे आणि ठावठिकाणासहित रसद पुरवली होती, असे पंजाब पोलिसांनी सांगितले.

यावर्षी २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात अन्य तीन जणांनाही गोळी लागली आहे. मुसेवाला आपल्या मित्रांसह मानसा या गावी जात असताना हे हत्याकांड घडवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT