Simi Garewal Brett Lee Australian Fast Bowler Sing Song esakal
मनोरंजन

Brett Lee Video : 'ओ हो लैला...'ब्रेट लीचं गाणं, सिमी गरेवाल झाली फिदा!

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या एका शो मध्ये आलेल्या सेलिब्रेटींना ते कशाप्रकारे बोलतं करतात हे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Simi Garewal Brett Lee Australian Fast Bowler Sing Song : ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा त्याच्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. ब्रेट लीचे भारत प्रेम हे त्याच्या अनेक चाहत्यांना परिचित आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासोबत ब्रेट लीनं एक अल्बमही रेकॉर्ड केला होता. आता ब्रेट ली पुन्हा एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या एका शो मध्ये आलेल्या सेलिब्रेटींना ते कशाप्रकारे बोलतं करतात हे दिसून आले आहे. त्यात ब्रेट लीनं त्यांच्या शो मध्ये जाऊन म्हटलेलं गाणं आणि तो व्हायरल झालेला व्हिडिओ तुफान चर्चेत आला आहे. त्या गाण्यानं सिमीजी ब्रेट लीवर फिदा झाल्या आहेत. ब्रेट ली चक्क हिंदी गाणे म्हणत असून त्याचा तो अंदाज नेटकऱ्यांना देखील कमालीचा आवडला आहे. रॉदेंवुझ विथ सिमी गरेवाल असे त्या कार्यक्रमाचे नाव असून तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या कमेंटसचा विषय आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीनं दिग्गज फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या ब्रेट लीचं व्यक्तिमत्व हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम असलं तरी गाणं आणि गिटार याविषयी त्याला प्रचंड प्रेम असल्याचे दिसून आले आहे. अशातच सिमीच्या त्या शोमध्ये गेलेल्या ब्रेट ली नं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. त्यावर त्याला आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट असल्याचे दिसून आले आहे.

सिमीनं ब्रेट ली शी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी सिमी यांचं हिंदी ऐकून त्यालाही हिंदीतून बोलण्याची हुक्की येते. तो तोडक्या मोडक्या शब्दांत त्याचे हिंदी सुरु करतो. यानंतर ब्रेट ली मुकाबला नावाचे गाणे गाण्यास सुरुवात करतो. गिटार वाजवत ब्रेट ली नं म्हटलेलं ते गाणं सिमीला खूपच भावले. तिनं त्याचं दिलखुलासपणे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT