sindhutai mazi maai marathi serial shivani sonar will played role of sindhutai sapkal colors marathi SAKAL
मनोरंजन

Sindhutai Mazi Mai: सिंधूताई मालिकेतली चिंधी झाली मोठी, ही अभिनेत्री साकारणार भुमिका?

सिंधूताई माझी माई मालिकेत आता सिंधूताईंची भुमिका लोकप्रिय मराठी अभिनेत्री साकारणार आहे

Devendra Jadhav

Sindhutai Mazi Mai News: कलर्स मराठीवरील सिंधूताई माझी माई ही मालिका सध्या चर्चेत आहे. ही मालिका थोर समाजसुधारक सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. सिंधूताई सपकाळ यांना अनाथांची माय असं संबोधलं जातं.

या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलं प्रेम मिळालं. मालिका TRP च्या शिखरावर आहे. अशातच सिंधूताई माझी माई मधील चिंधी आता मोठी होणार असुन एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

(sindhutai mazi maai marathi who will played role of sindhutai sapkal colors marathi)

सिंधूताई मालिकेत ही अभिनेत्री साकारणार सिंधूताईंची भुमिका

सिंधूताई मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. कलर्स मराठीने एक क्रिएटिव्ह शेअर केलाय. "यात चिंधी ते सिंधु हा प्रवास सुरू होणार, सिंधुची भूमिका कोण साकारणार?" असं कॅप्शन देण्यात आलंय.

हा फोटो बघून अनेकांनी तर्क वितर्क केले आहेत. यावरुन असं दिसतंय की, सिंधूताईंची भुमिका अभिनेत्री शिवानी सोनार साकारणार आहे.

सिंधूताई माझी माई मालिकेबद्दल थोडंसं..

ज्यांच्या आभाळाएवढ्या कार्याने सगळ्यांचं मन जिंकलं, ज्या लाखो अनाथ लेकरांच्या आई बनल्या अशा पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा, "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेत बघायला मिळतेय. ही मालिका संध्या. ७ वाजता कलर्स मराठीवर सुरु आहे.

सिंधूताईंच्या कार्यामुळे असंख्य अनाथ लेकरांना मायेची उब मिळाली, निराधार बालकांना हक्काचे घर मिळाले. सिधुताईंनी निव्वळ बालकांचे संगोपनच नाही केले तर त्यांना जगण्याची नवी उमीद दिली.

आता शिवानी सोनारच्या मालिकेतल्या एन्ट्रीने मालिकेला रंगतदार वळण येऊन सिंधूताईंचा संघर्ष उलगडणार आहे. शिवानीने याआधी राजा रानीची गं जोडी मालिकेत काम केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT