singer Aditya Narayan and Shweta Agarwal celebrate kiss day with smooch life is short find someone to love 
मनोरंजन

किस तो बनता है बॉस; आदित्य - श्वेताचा तो फोटो व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारा चेहरा म्हणून गायक आदित्य नारायणचा उल्लेख करता येईल. तो गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकला. मॅरिड लाईफ सध्या तो इंजॉय करताना दिसून येत आहे. आदित्य आणि त्याची पत्नी श्वेता यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तिच्याबरोबरचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर प्रसिध्द करत असतो. असाच एक फोटो त्यानं व्हायरल केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आदित्यनं व्हँलेटाईनच्या वीकमध्ये किस डे च्या दिवशी श्वेताला किस करतानाचा एक फोटो व्हायरल केला आहे. त्याला त्या दोघांच्याही फॅन्सनं मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. लाईक्स बरोबर तो शेअरही केला गेला आहे. त्या फोटोमध्ये आदित्य श्वेताला लिप किस करत आहे. आदित्यनं त्याच्या इंस्टा अकाऊंटवर तो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला कॅप्शन लिहिताना त्यानं म्हटले आहे की, हॅप्पी किस डे, आयुष्य छोटं आहे, प्रेम करण्यासाठी कुणाला तरी शोधा आणि त्या व्यक्तीवर प्रेम करा. त्याच्या त्या फोटोला एका चाहत्यानंही कमेंट दिली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, हॅप्पी किस डे, लवली कपल. काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी शेअर केले आहेत.

आदित्य आणि श्वेता हे एकमेकांना 10 वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी मागील वर्षी 1 डिसेंबरला लग्न केले. त्यात केवळ दोघांच्या परिवारातील आणि जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी झाले होते. लग्नानंतर हनीमूनसाठी ते दोघे कश्मिरला गेले होते. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदित्य आणि श्वेताची ओळख ही शापित चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

आदित्यच्या लग्नाच्यावेळी एक गंमत झाली होती. त्यानंच ती सोशल मीडियावर शेअरही केली होती. इंडियन आयडॉल कार्यक्रमात शादी स्पेशल नावाचा एक इपिसोड ठेवण्यात आला होता. त्यात भारती आणि हर्षनं त्याच्या लग्नातील तो प्रसंग सांगितला. लग्नाच्यावेळी आदित्यचा पायजमा फाटला होता. आदित्यची ती पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. 
 
 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT