singer adnan samis son azaan sami khan released new song main tera music video viral
singer adnan samis son azaan sami khan released new song main tera music video viral 
मनोरंजन

बापाच्या पावलावर पाऊल ठेवतोय मुलगा; अजान सामीचा व्हिडिओ व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गायन क्षेत्रात वेगळ्या शैली निर्माण करणा-या प्रसिध्द गायक अदनान सामीनं आपला चाहता वर्ग तयार केला. तो अनेकदा वादाच्या भोव-यातही सापडला होता. सध्या अदनान सामीचा मुलगा अजान सामी सोशल मीडियावर प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. त्याचे नवीन गाणे व्हायरल झाले आहे. ते लोकप्रिय झाले आहे. में तेरा असे त्या गाण्याचे नाव आहे.

पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अदनान सामी यांचा मुलगा अजान सामी खान याचा नवा अल्बम प्रसिध्द झाला आहे. त्याचे नाव मैं तेरा असे असून तो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्याची चर्चाही आहे. काही दिवसांतच त्याला 3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. पाकिस्तानमधील हे गाणे आता भारतातील अनेक संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एक गायक म्हणून आपले करिअर सुरु करण्याच्या अगोदर अजान हा परे हट लव, सुपस्टार आणि परवाज है जुनून सारख्या पाकिस्तानी चित्रपटांनाही त्यानं संगीत दिलं आहे. तसेच तो 021 या चित्रपटाचा लेखकही आहे.  प्रसिध्द झालेल्या अल्बममध्ये एकूण 9 गाणी आहेत.

अदनान सामीचा मुलगा असणा-या अजाननं आपल्या वडिलांकडून चांगला सल्ला मिळाल्याचे सांगितले. अजान हा अदनान सामीची पूर्वीची पत्नी जेबा बख्तियारचा मुलगा आहे. ती अभिनेत्री आहे. अजाननं सांगितले, मी प्रामाणिकपणे सांगतो की, माझ्या वडिलांनी माझी खूप मदत केली. आणि त्यांच्या कौतूकाला पात्र होणे कठीण आहे. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे ते एवढ्या लवकर प्रसन्न होत नाहीत. मला आठवते की, त्यांनी मला सांगितले होते की, ज्यावेळी तुझे गाणे लोकं ऐकतील तेव्हा भलेही त्यांना तुझे शब्द समजले नाही तरी चालेल मात्र ते गाणं लोकांच्या हद्याचा ठाव घेणारे हवे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT