Avdhoot Gupte Viral Video sakal
मनोरंजन

अवधूत गुप्तेचा 'तो' विडिओ होतोय व्हायरल, चाहते म्हणाले, 'जिंकलस भावा'..

कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' का कार्यक्रमाच्या ऑडिशन दरम्यान स्पर्धकासोबत एक किस्सा घडला; यावेळी अवधूतने जे काही केलं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

नीलेश अडसूळ

अवधूत गुप्ते (Avdhoot Gupte) म्हंटलं एक की एकदम चाबूक माणूस. त्यांनी संगीत क्षेत्रात अत्यंत मेहनत करून यश मिळवले आहे. गेले काही वर्षे ते विविध संगीत कार्यक्रमांमध्ये परीक्षक राहिले आहेत. पण त्यांची खास बात म्हणजे तर परीक्षकापेक्षा आपले जास्त वाटतात. त्यांचीभाषा, त्यांची बोली, त्यांचे काही शब्द हे कधीही न विसारण्यासारखे आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातला रासिकवर्ग त्यांच्यावर भरभरून प्रेम करतो. सध्या ते कलर्स मराठी (colors marathi) वरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात परीक्षक झाले आहेत. यावेळी ऑडिशन राऊंड दरम्यान त्यांनी जे काही केलं ते पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(singer avdhoot gupte motivating nervous contestant in sur nava dhyas nava)

चाबूक, तोडलस मित्र, जिंकलंस भावा असे काही अवधूत गुप्ते यांचे शब्द आपल्याला चांगलेच परिचित आहेत. त्याशिवाय त्यांच्या परीक्षणाला मजा आहे. पण नुकतच त्यांनी 'सूर नवा ध्यास नवा'च्या (Sur Nava Dhyas Nava) मंचावर त्यांचं चाबूक अंदाज दाखवला आहे. त्यांनी चक्क एका स्पर्धकाला मिठीच मारली आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. सध्या हा विडिओ बराच व्हायरल होत आहे. (Avdhoot Gupte Viral Video)

'सूर नवा ध्यास नवा'च्या सिजनच्या मेगा ऑडिशनच्या एका भागात गाणं सुरू असताना अचानक एक स्पर्धक गाणं विसरला. त्याला पुढचं काही आठवेना.तेव्हा अवधूतने यांनी चटकन माईक हातात घेऊन त्या स्पर्धकाची विचारपूस केली. जेव्हा गायकाने नर्व्हस झाल्याबद्दल खुलासा केला तेव्हा अवधूत म्हणाले, 'अर मग मी हिथ मदत करायला हाय की..', असं म्हणून ते उठले आणि त्या स्पर्धकाला मंचावर जाऊन मिठी मारली. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अवधूत यांनी केलेली ही कृती प्रेक्षकांना भलतीच भावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात

Sharad Pawar: राज ठाकरेंसाठी शरद पवार आग्रही; काँगेसलाही दिला मेसेज, उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

Horoscope Prediction 2025: उद्या तयार होतोय केंद्र त्रिकोण योग, शनिदेवाच्या आशीर्वादाने मेष अन् मिथुनसह 'या' 5 राशींचे उजळेल भाग्य

Couvade Syndrome: चक्क पुरुषांनाही जाणवतात प्रेग्नन्सीसारखी लक्षणं? जाणून घ्या काय आहे ‘कूवाडे सिंड्रोम’

SCROLL FOR NEXT