मुंबई - जेव्हा पासून सोशल मीडिया प्रभावी झाला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती लोकांसमोर यायला सुरुवात झाली आहे. अनेकांनी या व्यासपीठाचा स्वतच्या उत्कर्षासाठी उपयोग करुन घेतला आहे. दुसरीकडे कित्येकजण हे केवळ प्रसिध्दीसाठी त्या माध्यमांच्या मागे लागल्याचे दिसून आले आहे. गाणी, डान्स, फोटो, माहितीपर लेख, कला. शिल्प, संगीत. यासारख्या विविध विषयांवरही सोशल मीडियातून लिहिले, बोलले जात आहे. या व्यासपीठामुळे अनेक लहान गावातील नवोदित कलाकारांना आपल्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी मोठा मंच मिळाला आहे. या माध्यमाचा मोठा फायदा एका नवोदित कलाकाराला झाला आहे. ती कलाकार सर्वाधिक ह्युज मिळवणारी सर्वात कमी वयाची गायिका ठरली आहे.
प्रसिध्द आणि सुंदर असणा-या ध्वनि भानुशालीनं बॉलीवूडच्या संगीत दुनियेत एक मोठे स्थान निर्माण केले आहे. ध्वनिनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. अशी कामगिरी करणारी ती सर्वात कमी वयाची गायिका आहे. तिचा आता स्वतंत्र फॅन फॉलोअर्स आहे. सोशल मीडियावर तिच्या नावाची मोठी चर्चा आहे. 22 मार्च हा ध्वनिचा जन्मदिवस आहे. मुंबईत जन्म झालेल्या ध्वनिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिचे वडिल विनोद हे टी सीरिज या ग्लोबल मार्केटींग कंपनीच्या मीडिया पब्लिशिंगचे अध्यक्ष आहेत. ध्वनीनं आपलं सगळं शिक्षण हे मुंबईतून पूर्ण केलं. ध्वनिचे आजोबा दादा प्रधान भानुशाली संगीताचे भक्त राहिले आहेत.
एक गायिका म्हणून ध्वनिनं 2017 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिनं बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटातील हमसफर हे गाणे फिमेल व्हर्जनमध्ये म्हटले होते. त्या गाण्याला संगीतप्रेमींची चांगली पसंती मिळाली होती. 2019 मध्ये टी सीरिजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात ध्वनीच्या फोटोबरोबर तिचे दोन गाणीही होती. ले जा रे, आणि वास्ते नावाच्या गाण्यांनी युट्युबवर एक बिलियन व्ह्युज क्रॉस केले होते.
ध्वनिचं तिच्या आजोंबाबरोबर जिव्हाळ्याचे नाते होते. ज्या गोष्टी ती तिच्या आई वडिलांशी शेअर करत नसे ते ती त्या आजोबांशी मोकळेपणानं बोलत असे. तिनं सुरुवातीला आजोबांसाठी एका घरगुती कार्यक्रमामध्ये आरती म्हटली होती. ध्वनिचे आजोबांनी संगीताची सेवा केली आहे. ध्वनिला गायनाचं वरदान आपल्या आजोबांकडून मिळालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.