Justin Biber News  esakal
मनोरंजन

Justin Bieber: जस्टिन बिबरनं चाहत्याची माफी का मागितली?

आपल्या मधाळ आवाजानं जगभरातील तरुणाईला भुलवणारा जस्टिन बिबर हा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Justin Beiber News: आपल्या मधाळ आवाजानं जगभरातील तरुणाईला भुलवणारा जस्टिन बिबर हा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. मोठमोठ्या हॉलीवूडच्या सेलिब्रेटींपेक्षा त्याची (Social Media Post Viral) लोकप्रियता अधिक आहे. तरुणाईमध्ये तो विशेष प्रिय आहे. आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं त्याच्या चाहत्याची जाहिर माफी मागितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यानं त्या चाहत्याप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे. आपला पूर्ण दिवस चाहत्याला (entertainment news) दुखावल्याच्या आठवणीत गेला. त्यामुळे खूपच वाईट वाटल्याचे जस्टिननं म्हटले आहे. जस्टिनच्या या वागण्यामुळे त्यानं त्याच्या फॅन्सला जिंकून घेतले आहे.

जस्टिनच्या एका पोस्टवर त्याच्या चाहत्यानं कमेंट केली होती. शेलक्या शब्दांत त्यानं जस्टिनवर टीका केली होती. जी जस्टिनच्या जिव्हारी लागली. त्यानंतर जस्टिननं त्याला अपशब्द वापरत आपला राग व्यक्त केला होता. ती पोस्ट व्हायरलही झाली होती. मात्र आता जस्टिननं आपल्या त्या प्रतिक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जस्टिननं त्या चाहत्याला भलेही माझं गाणं अथवा माझी एखादी पोस्ट आवडली नसल्यास ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली ते योग्य नाही. मुर्खासारखे बोलू नये. अशी कमेंट केली होती. त्यावर जस्टिननं पुन्हा सोशल मीडियावर त्या चाहत्याची माफी मागितली आहे. वास्तविक एका वेगळ्या युझर्सनं जस्टिनच्या स्टोरीवर लांबलचक पोस्ट लिहिली होती.

एका चाहत्याला त्याच्या व्यक्त होण्यावर मी चांगलेच सुनावले होते. त्याला मला काहीही बोलण्याचा अधिकार आहे असे त्यानं लक्षात घेऊन मला प्रतिक्रिया दिली होती. मीच त्याला जे नाही ते बोललो. त्यानं मला बोलल्यामुले त्याला कदाचित आनंद झाला असेल अशावेळी मी त्याला आणखी काय बोलणार, पण त्या कमेंटमुळे माझा संबंध दिवस निराशेत गेला. त्यामुळे मी त्या व्यक्तीला आता सॉरी म्हणतो. मी त्याची माफी मागतो आहे. असे जस्टिननं म्हटले आहे.

जस्टिननं त्याची जस्टिन वर्ल्ड टूर पुन्हा एकदा सुरु केली आहे. सध्या तो नॉर्वेमध्ये आहे. रविवारी त्याचा त्याठिकाणी शो पार पडला. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जस्टिन लवकरच भारतात येणार असल्याची चर्चा आहे. 18 ऑक्टोबरच्या दरम्यान त्याचा दिल्लीमध्ये शो होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याच्या त्या शो साठीचे तिकिट चार हजार रुपयांपासून सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT