Kumar Sanu daughter On depression 
मनोरंजन

Kumar Sanu च्या मुलीनं डिप्रेशनमुळे केलेला स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न..म्हणाली,'तो दिवस आठवला तरी..'

आपल्या गोड गाण्यांनी प्रेक्षकांना नेहमीच आनंद देणाऱ्या कुमार सानू यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र दुःखांचा डोंगर पाहिला आहे.

प्रणाली मोरे

Kumar Sanu: गायक कुमार सानू गायकीच्या क्षेत्रातलं एक प्रसिद्ध नाव आणि व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या गाण्यात जेवढा गोडवा पहायला मिळतो तेवढं त्यांचं वैयक्तिक आयुष्य मुळीच तसं नाही . त्यांच्या मॅरिड लाइफपासून ते त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील मोठी उलथा-पालथ ऐकल्यानंतर कळतं की कुमार सानू यांच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलं आहे.

काही दिवसांपूर्वीच कुमार सानू यांची मुलगी शैननने मोठे खुलासे केले की जे ऐकल्यानंतर सगळे हैराण झाले आहेत. शैननने ऑनलाइन ट्रोलिंग संदर्भात बातचीत केली आहे. सोबत तिनं डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे आपण आपलं आयुष्य संपवणार होतो असं सांगत मोठा धक्का दिला आहे. शैनन म्हणाली की ही तिच्या आयुष्यातील मोठी चूक होती.

आपल्या आयुष्यातील वाईट काळाविषयी बोलताना कुमार सानू यांची मुलगी शैननने एका न्यूज पोर्टलला सांगितलं की जेव्हा ती पहिल्यांदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी जोडली गेली, तेव्हा ती फक्त १४-१५ वर्षाची होती. कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया सहन करण्यासाठी तिचं वय खूपच छोटं होतं,अल्लड होतं..ज्या कमेंट्स तिच्या फोटो किंवा पोस्टवर येत होत्या.(Singer Kumar sanu daughter shanon attempted suicide at the age of 15 details inside)

शैनननं सांगितलं की ती खूपच भोळी आणि दुबळी होती,ज्यामुळे तिनं ट्रोलिंग सारख्या गोष्टींना खूपच गंभीरतेनं घेतलं. शैनन पुढे म्हणाली की ट्रोलिंगनं तिच्या डोक्यात अशा पद्धतीनं घर केलं की ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि आत्महत्या करण्याचा तिनं प्रयत्न केला. आपल्याला आयुष्य जगणं खूपच कठीण बनून गेलं होतं आणि ते आपल्या आयुष्यातील ब्लॅक डेज होते असं देखील शैनन म्हणाली.

शैनन याविषयी बोलताना पुढे म्हणाली की तिचं कुटुंब आणि मित्रपरिवार तिला या डिप्रेशनच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी तिच्या सोबत होते आणि यामुळेच खरं तर ती खूप काही शिकली. तिनं आपल्या आयुष्यात जे काही अनुभवलं..त्यातून जे काही ती शिकली..आता तिला इतरांसाठी त्याचा वापर करायचा आहे,जे मानसिक आजाराचा सामना करत आहेत. तिला अशा लोकांना सांगायचे आहे की अंधाराच्या शेवटी प्रकाश आहे कारण तिनं देखील हा प्रवास केला आहे.

शैनन ही कुमार सानू आणि त्यांची दुसरी पत्नी सलोनी भट्टाचार्य यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे, कुमार सानू यांना आणखी एक मुलगी आहे जिचं नाव एना आहे.

कुमार सानू यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य हिला तीन मुलं आहेत,ज्यांची नावे अनुक्रमे जिको,जस्सी आणि जान कुमार सानू अशी आहेत. कुमार सानू यांनी आपल्या पहिल्या पत्नीसोबत १९८० साली लग्न केलं होतं. दोघांनी १९९४ मध्ये घटस्फोट घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT