Singer Lucky Ali Esakal
मनोरंजन

Lucky Ali: 'इब्राहिमपासूनच ब्राह्मण शब्दाची निर्मिती'.., गायकाच्या वक्तव्यामुळे खळबळ आता म्हणतोय,' मला फक्त..'

गायक लकी अली एका फेसबुक पोस्टमुळे वादात सापडला असून, त्यानंतर त्याने माफी मागितली आहे. आता त्यांनी ब्राह्मणांबद्दलची पोस्टही डिलीट केली आहे.

Vaishali Patil

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते प्रत्यके मूद्यावर त्याचं मत परखडपणे मांडत असतात. त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध गायक लकी अली. त्याने याची फार क्वचित गाणी गायली असली तरी त्याचा चाहता वर्ग हा तगडा आहे. त्याची क्रेझ तरुणांनमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

लकी अली बर्याच काळापासून इंडस्ट्रीचा एक महत्वाचा भाग आहे. अनेकदा विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतो. लकी अली वादात आला आहे. त्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

त्याने अलीकडेच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती , ज्यामध्ये त्याने दावा केला होता की 'ब्राह्मण' हा शब्द 'इब्राहिम' वरून आला आहे. लकी अलीची ही पोस्ट काही काळातच व्हायरल झाली आणि त्याच्यावर चारही बाजूंनी जोरदार टीका होऊ लागली होती. वाढता विरोध पहाता त्यानंतर त्याने ती पोस्ट स्वतःच डिलीट केली आणि आता त्याने या प्रकरणावर माफीही मागितली आहे.

Singer Lucky Ali post

लकी अलीने डिलिट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "ब्राह्मण हे नाव 'ब्रह्मा' पासून आले आहे आणि 'ब्रह्मा' हे 'अब्राम’' वरून आले आहे...जे अब्राहम किंवा इब्राहिमपासून आले आहे." ब्राह्मणांना इब्राहिमचे वंशज म्हणून वर्णन करताना त्यांने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ब्राह्मण हे इब्राहिम अलैहिस्सलाम यांचे वंशज आहेत… सर्व राष्ट्रांचे जनक… मग लोक एकमेकांशी तर्क न करता फक्त वाद आणि भांडण का करतात?

लकी अलीची ही पोस्ट नेटकऱ्यांना मुळीच आवडली नाही. त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याच्या पोस्टवरुन बराच वादही झाला. वाढता वाद लक्षात घेता त्याने त्यांची पोस्ट डिलिट केली आणि त्यानंतर माफीची पोस्टही शेअर केली.

आपल्या नवीन पोस्टमध्ये लिहिलं की, त्यांचा उद्देश हा केवळ समाजातील विविध घटकांमधील लोकांना एकत्र करणे आहे. त्याला कोणामध्ये राग किंवा दुःख निर्माण करायचं नाही.

Singer Lucky Ali post

लकी अलीने लिहिले की, मला माझ्या मागील पोस्टच्या वादाची जाणीव आहे. कोणालाही त्रास किंवा राग आणण्याचा माझा हेतू नव्हता आणि मला त्याबद्दल मनापासून खेद आहे. आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा हेतू होता पण हे योग्य नाही हे माझ्या लक्षात आले. मला जे म्हणायचे होते ते चुकीच्या पद्धतिने मांडले गेले. यापुढे मी जे पोस्ट करत आहे त्याबद्दल मी अधिक जागरूक राहील. माझ्या बोलण्याने माझ्या अनेक हिंदू बंधू भगिनींना त्रास झाला आहे. याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. मी तुमच्या सर्वावर खुप जास्त जास्त प्रेम करतो.

लकी अली प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन मेहमूद यांचा मुलगा आहे. त्यांनी अनेक उत्तम गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT