shreya ghoshal.
shreya ghoshal. 
मनोरंजन

‘कुणी तरी येणार गं..’ श्रेयाचा डोहाळे जेवण सोहळा पाहिलात का? 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल नेहमीच तिच्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. काही  दिवसांपूर्वी तिने गरोदर असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यावेळी श्रेयावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. श्रेयाने ही बातमी सोशल मिडीयवर चाहत्यांना सांगण्यासाठी एक खास फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये श्रेया तिचे बेबी बंम्प फ्लोन्ट करताना दिसत होती. श्रेयाने नुकतेच तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यावेळी श्रेयाच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास सरप्राईझ दिले. कोरोनामुळे श्रेयाच्या मैत्रिणींनी डोहाळे जेवणाला व्हिडीओ काॅल वरून उपस्थिती लावली. या सोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला श्रेयाने कॅप्शन दिले, ‘लांब असूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या ‘बावरी’जकडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळे जेवण…प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवलं. खूप मज्जा आली, खेळही खेळले. मी किती लकी आहे!’

VIDEO: 'कोरोना देशातून निघून जा'; मंत्र्याने एअरपोर्टवर केली पूजा

5 फेब्रुवारी 2015 रोजी श्रेयाचे शिलादित्य मुखोपाध्याय या बिझनेस मॅनसोबत लग्न झाले. त्यानंतर मार्च 2021 मध्ये श्रेयाने आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. आपल्या पतीसोबतचा फोटो तिने यावेळी शेअर केला होता. श्रेयाने आपल्या या खास काळाबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. ती म्हणाली होती, “ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान भावना आहे. मी आयुष्यातल्या सर्वात सुंदर काळात आहेत. खरंच हा देवाचा चमत्कार आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT