singham again ajay devgn bajirao singham look out now bollywood movie rohit shetty SAKAL
मनोरंजन

Singham Again: पुन्हा घुमणार डरकाळी! गुन्हेगारांचा थरकाप उडवणाऱ्या अजय देवगणचा सिंघम लूक पाहाच

अजय देवगणचा सिंघम अगेन मधील लूक समोर आलाय

Devendra Jadhav

Singham Again Ajay Devgn: गेल्या अनेक दिवसांपासून सिंघम अगेन सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिंघम अगेन सिनेमातील दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ अशा कलाकारांचा लूक व्हायरल झाला.

आता सिंघम अगेनमधील आपल्या सर्वांचा लाडका बाजीराव सिंघम म्हणजेच अजय देवगणचा लूक समोर आलाय.

अजय देवगण पुन्हा एकदा बाजीराव सिंघमच्या भूमिकेत

शेर आतंक मचाता है, और जखमी शेर तबाही. सगळ्यांचा आवडता कॉप.. बाजीराव सिंघम इज बॅक, असं कॅप्शन देत अजय देवगणचा लूक शेअर करण्यात आलाय.

अजय देवगण सिंघमच्या लूकमध्ये एकदम जबरदस्त दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग पाहायला मिळतोय. त्यामुळे सिंघम अगेनमध्ये अजय देवगण पुन्हा एकदा बाजीराव सिंघम बनून सिनेमा गाजवणार यात शंका नाही.

सिंघम अगेन मध्ये दिसणार कॉप युनिव्हर्स

सिंघम अगेनचं दिग्दर्शन रोहीत शेट्टीने केलंय. या सिनेमाच्या निमित्ताने रोहीत एक भन्नाट कॉप युनिव्हर्स समोर आणणार आहे. रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन मध्ये अजय देवगण प्रमुख भुमिकेत आहेच. शिवाय अक्षय कुमार, रणवीर सिंग अनुक्रमे सुर्यवंशी आणि सिंबाच्या भुमिकेत झळकणार आहेत.

सिंघम अगेनमध्ये नवीन कलाकार सहभागी

रोहीत शेट्टीच्या सिंघम अगेन या भन्नाट कॉप युनिव्हर्समध्ये यावेळी दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ हे सुपरस्टार कलाकार सुद्धा सामील झाले आहेत. याशिवाय अभिनेत्री करिना कपूर सुद्धा सिंघम अगेनमध्ये झळकणार आहे.

अशाप्रकारे सिंघम अगेनमध्ये या सर्व लोकप्रिय कलाकारांना एकत्र पाहणं एक पर्वणी असणार यात शंका नाही. सिंघम अगेन पुढील वर्षी २०२४ ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Tariff: तर हा आहे अमेरिकेचा मास्टर प्लॅन, भारतावर का लावला टॅरिफ? पत्रकार परिषदेत सांगतिलं कारण

Pune Rain Update : पावसाचा जोर पुण्यात ओसरला; कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ

Khadakwasla Dam : पावसाचा जोर ओसरला, खडकवासला धरणातून विसर्गात घट

Solapur Fraud: गृहनिर्माणची जागा परस्पर विकून २७ लाखांचा अपहार; २२ जणांवर गुन्हा, शासनाची फसवणूक

Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात

SCROLL FOR NEXT