Singham Again movie Shweta Tiwari Joins Forces With Rohit Shetty’s Cop Universe photo viral  Esakal
मनोरंजन

Singham Again: ना दीपिका ना कतरिना या प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीची रोहित शेट्टीच्या सिंघममध्ये एंट्री!

Vaishali Patil

गेल्या काही दिवसापासून रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाची खुप चर्चा होती. सिंघम या चित्रपटाची एक वेगळी आणि तगडी फॅन फॉलोइंग आहे.

रोहित शेट्टी त्याच्या सुपरहिट फ्रँचायझी 'सिंघम' चा तिसरा चित्रपट बनवत आहे. काही दिवसांपुर्वी रोहित शेट्टीने या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत शुटिंगचा श्रीगणेशा केला. त्याचे फोटो रोहितने सोशल मीडियावर शेयर केले होते.

अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटात आता एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे श्वेता तिवारी.

श्वेता तिवारी हिला वेगळ्या परिचयाची गरज नाही. 'कसौटी जिंदगी के' मालिकेद्वारे ती घराघरात पोहचली. ती बिग बॉस शोची विजेती देखील आहे. तिची लेक पलक तिवारी हिने देखील सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. आता श्वेता तिवारीही देखील मोठ्या पडद्यावर तिची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

श्वेता तिवारीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रोहित शेट्टीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यानंतर सिंघम अगेनमध्ये तिची वर्णी लागल्याच्या बातम्या जोर धरु लागल्या आहेत.

श्वेताने नुकतच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेता विकास कलंतरीची एक पोस्ट रिशेअर केली आहे. ज्यामध्ये ती रोहित शेट्टीसोबत पोज देताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शन त्याने लिहिले आहे की, "आमच्या रॉकस्टार श्वेता तिवारीचं कॉप युनिव्हर्समध्ये स्वागत आहे. सिंघम अगेन." आता या पोस्टद्वारे श्वेता सिंघम अगेन या चित्रपटाचा भाग असणार आहे. याची पुष्टी झाली आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सिंघम अगेन चित्रपटाची शूटिंग सुरु झाली असून हा चित्रपट ऑगस्ट 2024 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT