allu arjun Sakal
मनोरंजन

Allu Arjun: अल्लू अर्जुन त्याच्या सहा वर्षाच्या मुलीला योगा करताना पाहून झाला आश्चर्यचकित

एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच अल्लू अर्जुन एक चांगला पती आणि वडील देखील आहे.

सकाळ डिजिटल टीम

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या कामासोबतच त्याच्या कुटुंबाला देखील वेळ देतो. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच अल्लू अर्जुन एक चांगला पती आणि वडील देखील आहे.

तो अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच फॅमिलीसोबत व्हेकेशनवर दिसला होता. त्याचवेळी त्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मुलीला योगा करताना पाहून आश्चर्यचकित झालेला दिसत आहे.

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची लाडकी अल्लू अरहा योगा करताना दिसत आहे. आपल्या 6 वर्षांच्या मुलीला हे करताना पाहून अल्लूला खूप आश्चर्य वाटत आहे.

अभिनेत्याची मुलगीही अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अशा परिस्थितीत अल्लू स्वतः तिला पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. अरहाला रुपेरी पडद्यावर पाहणे हा तिच्या कुटुंबासाठीही खूप खास क्षण असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता याबद्दल म्हणाला होता - मला स्वतःला माहित नाही की अरहाला ऑनस्क्रीन पाहून मला कसे वाटेल. अरहा अल्लू अर्जुनच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे जी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे.

allu arjun

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूच्या शाकुंतलम या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण करणार आहे. पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सामंथाशिवाय माधो, देव मोहन, अनन्या नागला आणि कबीर दुहान सिंग दिसणार आहेत.

सध्या अभिनेता त्याच्या आगामी 'पुष्पा २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलवरही निर्माते मनापासून काम करत आहेत. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (८ एप्रिल) पुष्पा २ चा टीझर प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, 'पुष्पा 2' मध्ये साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

विधानपरिषदेआधी काँग्रेसला धक्का? ७० नगरसेवक नॉट रिचेबल; राज्यात खळबळ

Jio New Recharge : जिओची धमाकेदार ऑफर! 'या' रिचार्जमध्ये मिळणार Netflix-Amazon सारखे 15 OTT ॲप्स; तसेच 5GB डेटासुद्धा

World Thyroid Day 2026: अचानक शरीरात बदल जाणवत आहेत? थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावरील सोपे उपचार समजून घ्या

SCROLL FOR NEXT