'स्लमडॉल मिलेनियर' Slumdog Millionaire फेम अभिनेत्री फ्रीडा पिंडो Freida Pinto हिने तिच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फ्रीडाने गेल्या वर्षी कॅलिफॉर्नियातील होंडा सेंटर याठिकाणी कॉरी ट्रॅन याच्याशी गुपचूप लग्न केलं. वर्षभरानंतर तिने लग्नाचा खुलासा केला. 'होय, हे खरं आहे. एक वर्षापूर्वी आमचं लग्न पार पडलं. आम्ही ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही फक्त आमच्या आयुष्याचा आनंद घेत होतो आणि ज्यांनी विचारलं त्यांना आम्ही ही आनंदाची बातमी सांगितली', असं कॅप्शन फ्रीडाने या फोटोंना दिलं आहे.
'योग्य प्रमाणात प्लॅनिंग आणि उत्स्फुर्तता यांच्यात समतोल राखण्यावर कॉरी आणि माझा भर होता. असंच एके दिवशी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. ते क्षण खूप खास होते आणि आम्ही दोघांनीही या विवाहसोहळ्याचा आनंद घेतला. आता आमच्या आयुष्यात होंडा सेंटर या जागेचं एक वेगळंच महत्त्व निर्माण झालं आहे', असं तिने पुढे लिहिलं.
कॉरी आणि फ्रीडा यांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बेबी शॉवरचेही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फ्रीडाने 'राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स', 'इम्मॉर्टल्स', 'तृष्णा', 'लव्ह सोनिया' आणि 'मोगली: लेजंड ऑफ द जंगल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. फ्रीडाने याआधी 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेता देव पटेलला डेट केलं होतं. जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी ब्रेकअप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.