Smriti Irani Daughter Shanelle Wedding Destination  esakal
मनोरंजन

Smriti Irani : पाचशे वर्षे जुन्या किल्ल्यात स्मृती इराणींच्या मुलीच लग्न, फोटो भलतेच खास

केंद्रीय मंत्री आणि पूर्वी टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या अभिनेत्री स्मृती इराणी या चर्चेत आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Smriti Irani Daughter Shanelle Wedding Destination : केंद्रीय मंत्री आणि पूर्वी टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या अभिनेत्री स्मृती इराणी या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या मुलीचं शनेलचं लग्न हे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून त्यासाठी राजस्थानमधील जोधपूरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.

यासगळ्यात ज्याठिकाणी इराणी यांच्या मुलीचं लग्न होणार आहे ते विवाहस्थळ सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. यापूर्वी शनेलच्या विवाहसोहळ्यातील काही फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे. शनेलचा २०२१ मध्ये अर्जुन भल्लाशी साखरपुडा झाला होता. त्यानंतर अर्जुननं तिला जोधपूर आणि नागौरमधील खिंवसर किल्ल्यामध्ये प्रपोझही केलं होतं. याच ठिकाणी लग्न करायचं अशी त्यांची इच्छा होती.

Smriti Irani Daughter Shanelle Wedding Destination

खिंवसर किल्ला हा राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील खिंवसर गावामध्ये असून तो पाचशे वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येते. १५२३ मध्ये हा किल्ला राव करमसजी यांनी बांधला होता. ते जोधपुरचे राव जोधा यांचे आठवे पुत्र होते. १५ व्या शतकात तयार झालेल्या या किल्ल्याच्या एका बाजुला वाळवंट तर दुसऱ्या बाजुला सुंदर तळे आहे. राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीत या किल्ल्याचे नाव असतेच.

Smriti Irani Daughter Shanelle Wedding Destination

खिंवसर किल्ल्यामध्ये ७१ खोल्या असून ४ वेगवेगळे हॉटेल्स आहेत. २ बँकेट आणि मीटिंग व्हेन्यु आहेत. १८ लक्झरी हट्स गावं आहेत. अशा वेगवेगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या किल्ल्याची पर्यटकांना आणि मोठ्या सेलिब्रेटींना नेहमीच भुरळ पडत असल्याचे दिसून आले आहे.

Smriti Irani Daughter Shanelle Wedding Destination

स्मृती इराणी यांच्या मुलीविषयी सांगायचे झाल्यास, ती वकील असून तिचा २०२१ मध्ये अर्जुन भल्ला सोबत साखरपुडा झाला होता. आता अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता असून तीन दिवस हा शाहीविवाह सोहळा चालणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या विवाहसोहळ्याला राजकीय, मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बघलं कोणीतरी आम्ही नाही जा! सुकन्या मोनेंनी सादर केली ठसकेबाज लावणी, सोशल मीडियावर Video Viral

Accident News : येवल्याजवळ भीषण अपघात: भरधाव फॉर्च्युनर पलटी; तीन साईभक्तांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मुंबईतील KEM रुग्णालयात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला

Bank Director Rule : वर्षांनुवर्षे सहकारी बँकेत तळ ठोकलेल्या संचालकांना बसणार दणका! आमदार, खासदारांना फटका

Shreyas Iyer ने दुखापतीनंतर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल...'

SCROLL FOR NEXT