Snehal Rai On Trolls Esakal
मनोरंजन

Snehal Rai On Trolls: 21 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न केल्याने झाली ट्रोल! अभिनेत्रीनेही चांगलंच सुनावलं.. म्हणाली, 'मी आहेच..'

Vaishali Patil

Snehal Rai On Trolls:  'इश्क का रंग का सफेद' फेम अभिनेत्री स्नेहल राय ही अनेक वेळा सोशल मिडियावर चर्चेत असते. तिने यूपीमधील राजकारणी माधवेंद्र राय यांच्याशी विवाह केला आहे. तो तिच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठा आहे.

त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत. स्नेहलने तिला पती आणि तिच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल सांगितले. मात्र, त्यानंतर स्नेहलला 'लोभी' आणि 'गोल्ड डिगर' म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले होत. वयात खुप अंतर असल्यामुळे स्नेहल राय अजूनही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. स्नेहल या सगळ्याला खुपच कंटाळलेली आहे आणि आता तिने ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

टीव्ही अभिनेत्री स्नेहल रायने नुकतचं तिने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत 21 वर्षांपेक्षा मोठ्या माणसाशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांवर तिची प्रतिक्रिया दिली.

स्नेहल म्हणाली, “माझ्या लग्नाबद्दल मला ट्रोल करणार्‍या सर्व लोकांसाठी मला एकच सांगायचे आहे, “होय मी गोल्ड डिगर आहे कारण माझ्या पतीकडे 24 कॅरेट सोन्याचं हृदय आहे.”

स्नेहलने तिचा पती, राजकारणी माधवेंद्र रायची एक स्टोरी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले, "माय मॅन ! स्वभाव आणि वेळेसमोर पैशाचा परिचय नसतो... अज्ञानी लोकांना हे कधीच समजणार नाही.

आधी स्नेहलनं तिच्या लव्हस्टोरीबद्दल चाहत्यांना सांगितले होते. ती दिल्लीतील एका शोमध्ये तिचे पती माधवेंद्र यांना भेटली होती. विषेश म्हणजे ती या कार्यक्रमात ती होस्ट होती आणि ते माधवेंद्र राय प्रमुख पाहुणे होते. येथे त्यांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. स्नेहलने वयाच्या अंतराकडेही लक्ष न देता वयानी 21 वर्षांनी मोठ्या माणसासोबत लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT