मनोरंजन

'हा माझा शेवटचा व्हिडिओ, त्यानंतर मी नसेल', झालंही तसचं...

चाहत्यांनी जे सांगितलं त्यांचं ऐकून तिला आपला जीव गमवावा लागला आहे.

युगंधर ताजणे

सोशल मीडियावरुन प्रसिद्धी मिळवणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. एखादं लाईव्ह किंवा व्हिडिओ तयार करुन तो पोस्ट करणे, त्यात काही हटके कृती करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणे आणि चर्चेत येणं हे अनेकांना जमलं आहे. त्यामुळे लाईक्स आणि कमेंटसच्या अट्टाहासापायी ते काहीही करायला तयार होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशीच एक घटना सोशल मीडिया इन्फ्ल्युंएसरच्या बाबत घडली आहे. मात्र चाहत्यांनी जे सांगितलं त्यांचं ऐकून तिला आपला जीव गमवावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती.

तरुणाई सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाली आहे. त्यांचा दिवस आणि रात्र या सोशल मीडियावर ऑनलाईन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना अनेक परिणांमांनाही सामोरं जावं लागलं आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर हा नवीन प्रकार ऑनलाईनच्या दूनियेत लोकप्रिय झाला आहे. त्याच्या प्रभावात अनेकजण असल्याचे दिसून येते. चीनमध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरच्या बाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चीनमधील प्रख्यात इन्फ्ल्युएंसर लुओ शाओ माओ जी चा फॉलोअर्सचं ऐकल्यामुळे मृत्यु झाला आहे. तिला फॉलोअर्सनं लाईव्ह व्हिडिओमध्ये विषप्राशन करण्यास सांगितले. तिनं त्यांचं ऐकलं आणि पेस्टिसाईड अर्थात कीडे मारण्याचं औषध पिलं. उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाल्याची बातमी समोर आली आहे. तिला तिच्या चाहत्यांनी ते पेस्टिसाईड प्यावं म्हणून प्रवृत्त केलं होतं.

ते औषध पिल्यानंतर तिला काही वेळानं त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीनं तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यत बराच उशीर झाला होता. यावेळी तिनं आपल्या फॉलोअर्सला सांगितलं होतं की, हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल यानंतर मी नसेल तिनं सांगितलं होतं. ती गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचे तिच्या मित्र परिवारानं सांगितलं आहे. डेलि स्टारनं दिलेल्या माहितीनुसार, माओचं Douyin या नावानं सोशल मीडियावर अकाउंट होते. त्याचे सहा लाख फॉलोअर्स होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

Thane Water Supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २४ तास पाणीकपात, कोणत्या भागांना फटका?

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Rare Otters in Sangli : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! कृष्णा नदीपात्रात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ पाणमांजरांचा कळप; 8 ते 9 पाणमांजरं दिसली एकत्र

SCROLL FOR NEXT