Salman Khan  
मनोरंजन

'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाचा सलमानवर हल्लाबोल; 'आता तरी..'

सलमानसोबत काम न करण्यामागचं सांगितलं कारण

स्वाती वेमूल

'बिग बॉस' Bigg Boss या सर्वांत वादग्रस्त आणि तितक्याच चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक सोफिया हयात Sofia Hayat हिने सूत्रसंचालक सलमान खानवर Salman Khan निशाणा साधला आहे. 'माझी नैतिकता आणि सत्य हे माझ्या अहंकारापेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्याने मी फिनालेमध्ये हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता', असं ती म्हणाली. २०१३ मध्ये पार पडलेल्या बिग बॉसच्या सातव्या पर्वात सोफियाने स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो पोस्ट करत सोफियाने सलमानसाठी एक मोठी पोस्ट लिहिली आहे. स्वत:च्या वयापेक्षा लहान अभिनेत्रींना चित्रपटात सहकलाकार म्हणून घेण्यावरही सोफियाने सलमानला सुनावलं. (Sofia slams Salman says she deliberately did not share Bigg Boss stage with him)

'प्रत्येक वेळी चित्रपट प्रदर्शित होत असताना सलमान एकच युक्ती अंमलात आणत असतो. ईद या धार्मिक उत्सवाचा तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापर करतो. दरवेळी तीच कथा, तेच लूक्स आणि लहान वयाच्या अभिनेत्रींना संधी देतो. आता तुझ्या वयाच्या अभिनेत्रींना संधी देण्याची वेळ आली आहे, असं नाही का वाटत? त्याचे प्रेक्षक आता सतत तेच तेच पाहून वैतागले आहेत. राधे चित्रपटाचा ट्रेलर पाहूनसुद्धा मला हेच वाटलं की, हे सर्व मी आधीसुद्धा पाहिलंय', असं तिने लिहिलं.

'राधे' या चित्रपटातील रणदीप हुडाच्या भूमिकेवरून तिने पुढे लिहिलं, 'रणदीपला चित्रपटात पाहणं त्रासदायक होतं. इतक्या चांगल्या अभिनेत्यासाठी इतकी वाईट स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्याहून वाईट भूमिका दिली होती. सलमानसोबत काम करण्यासाठी त्याने ती भूमिका स्विकारली का? इंडस्ट्रीची हीच मोठी समस्या आहे. प्रतिष्ठेसाठी भूमिका स्विकारल्या जातात. जर त्याने त्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतला असता तर त्याला बॉलिवूडमधूनच बाहेर काढलं असतं. मी स्वत: बिग बॉसच्या अंतिम एपिसोडमध्ये सलमानसोबत न झळकण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या अहंकारापेक्षा माझी नैतिकता आणि सत्य अधिक सामर्थ्यवान आहेत.'

सध्या सलमानच्या विरोधात असलेल्या स्वयंघोषित समिक्षक कमाल आर खानने या पोस्टसाठी सोफियाचं कौतुक केलं. सलमानने केआरकेवर मानहानीचा दावा केल्यानंतर तो सतत सलमानवर निशाणा साधताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

SCROLL FOR NEXT